जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल जोरदार फॉर्ममध्ये आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने केवळ ५१ चेंडूत ७७ धावा केल्या. यासह राहुल या हंगामात सर्वाधिक अर्धशतके करणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम फलंदाजी निवडली आणि पंजाबपुढे १७७ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने लवकरच मयंक अगरवाल (११ धावा) आणि ख्रिस गेलची (२४ धावा) महत्त्वपूर्ण विकेट गमावली. त्यामुळे संघाच्या विजयाची पताका फडकवण्यासाठी राहुलने जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन केले आणि केवळ ३७ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली.
हे राहुलचे आयपीएल २०२० मधील पहिले-दूसरे नव्हे तर तब्बल पाचवे अर्धशतक होते. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळाडूला हा विक्रम करता आलेला नाही. राहुलव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सचा फाफ डू प्लेसिस, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा एबी डिविलियर्स आणि मुंबई इंडियन्सचा क्विंटन डी कॉक यांनी या हंगामात ४ अर्धशतके केली आहेत.
शेवटी राहुलची उल्लेखनीय फलंदाजी फळाला आली आणि पंजाबने दूसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. मात्र हा त्यांचा हंगामातील तिसराच विजय होता. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत हा संघ अद्यापही बराच पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL: ‘मागील ३ सामन्यात…’, कोलकाताविरुद्ध सामना गमावल्यानंतर डेविड वॉर्नरचे मोठे वक्तव्य
नादच खुळा! हैदराबादच्या ‘कॅप्टन’ने केलीय विराट, रोहित आणि रैनाच्या तिकडीला लाजवेल अशी कामगिरी
‘सुपर’ थरार!! कोलकाताच्या फर्ग्युसनने हैदराबादच्या जबड्यातून खेचला विजय
ट्रेंडिंग लेख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष