स्कॉटलंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार कायले कोएत्झरने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, तो वनडे क्रिकेट खेळणार आहे.
Kyle Coetzer retires from T20s at the age of 38 – he captained Scotland to the Super 12s at last year's World Cup https://t.co/xacMmfAWM3 pic.twitter.com/zO2cyRNaTq
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 21, 2022
स्कॉटलंड क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कायले कोएत्झरला ओळखले जाते. मागील वर्षी संयुक्त अरब अमीरात येथे झालेल्या टी२० विश्वचषकात तो स्कॉटलंड संघाचा कर्णधार होता. मागील महिन्यातच त्याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिलेला. निवृत्ती स्वीकारताना त्याने म्हटले,
“मी आता भरपूर टी२० क्रिकेट खेळलो आहे. आगामी काळात प्रशिक्षक म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे. कुटुंबाला, ज्यामध्ये माझ्या दोन लहान मुली आहेत, त्यांना वेळ देता यावा म्हणून, तसेच संघात एका युवा खेळाडूला संधी मिळावी म्हणून मी निवृत्ती घेतोय. याबाबत मी स्कॉटलंड क्रिकेट बोर्डानी बोललो देखील आहे.” टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, कोएत्झर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे मालिकेत खेळताना दिसेल.
स्कॉटलंडसाठी ७० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या ३८ वर्षीय कोएत्झरने आपल्या कारकीर्दीची सुरुवात २००८ मध्ये केली होती. त्याने आपल्या टी२० कारकिर्दीत ६ अर्धशतकांच्या मदतीने १४९५ धावा केलेल्या आहेत. तसेच स्कॉटलंडसाठी सर्वाधिक टी२० सामने देखील त्यानेच खेळलेत. सन २०२० मध्ये आयसीसीच्या वतीने दिला जाणारा सहयोगी देशाचा सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार त्याने पटकावला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इतर देशातील टी२० लीगमध्ये खेळणार भारतीय क्रिकेटपटू?
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ
‘…तर मी भारताविरुद्ध खेळलायला घाबरलो असतो’, विराट कोहलीविषयी रिकी पाँटींगचे मोठे विधान