---Advertisement---

Video: अर्धशतकवीर शुभमन गिलची कमजोरी झाली जगजाहीर! सतत एकाच प्रकारे होतोय बाद

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 10:18 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये सुरुवात झाली. कसोटी मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना संधी दिली गेली. सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने देखील दुखापतीनंतर या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने या सामन्यात सुरुवातीच्या काही षटकांमध्ये सेट झाल्यानंतर चांगली खेळी केली आणि त्याच्या कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले. तो कारकिर्दीतील पहिल्या शतकाच्या दिशेने चाललाच होता, पण न्यूझीलंडच्या काइल जेमिसनच्या चेंडूवर पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाला.

गिलने सामन्यातील त्याच्या पहिल्या डावात ५२ धावांची खेळी केली आणि तो बाद झाला. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. सामन्यात तो ज्याप्रकारे बाद झाला, त्यावरून त्याची एक कमजोरी पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. तो यापूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळताना देखील अशाच प्राकरे बाद झाला होता. त्यावेळी कोरी एंडरसनने त्याचा स्टंप उडवला होता. यावेळीही तो काइल जेमिसनच्या गोलंदाजीचा अगदी त्याचा प्रकारे शिकार झाला आहे.

त्याची ही कमजोरी संघाच्याही लक्षात आली असावी. मागच्या १४ डावांचा विचार केला तर, त्यापैकी सहा वेळा तो पायचित किंवा त्रिफळाचीत झाला आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर पहिल्या षटकात काइल जेमिसन गोलंदाजीसाठी आला होता. जेमिसनने त्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गिलची विकेट मिळवली. जेमिसनने हा चेंडू ऑफ संपच्या बाहेर गुड लेंथवर टाकला होता. या चेंडूला आडवण्याच्या प्रयत्नात असताना गिलच्या बॅट आणि पॅडमध्ये जास्त अंतर निर्माण झाले होते. त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटला घासून थेट संपमध्ये घुसला.

https://twitter.com/jennife74834570/status/1463770642860240897?s=20

दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या काइल जेमिसनने उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वांनाच प्रभावित केले. त्याने पहिल्या दिवशी न्यूझीलंडसाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेतले. यामध्ये त्याने भारतीय संघाची सलामीवीर जोडी मयंक अगरवाल आणि शुभमन गिलला तंबूत माघारी पाढवण्याचे काम केले. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणेला देखील त्यानेच बाद केले. यापूर्वी जेमिसनने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला हैराण केले होते. त्याने जेतेपदासाठी खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताला नडणाऱ्या किवी गोलंदाजाला शुभमनने ठोकला कडक षटकार, कपिल यांची करुन दिली आठवण

द्रविडला गोष्टी बदललेल्या आवडत नाही म्हणतात, तेच खरे! संघाच्या जुन्या प्रथेची पुन्हा केली सुरुवात

अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी मिळल्याने माजी निवडकर्ता खुश; म्हणाले, ‘अनेकांनी माहीत नसेल की…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---