आयपीएल २०२१ च्या लिलावात अनेक खेळाडू कोट्याधीश झाले. अशातच लिलावापूर्वी, दिग्गज भारतीय फलंदाज गौतम गंभीरने ज्याची तुलना आंद्रे रसल सोबत केली होती. तो म्हणजे न्यूझीलंड संघाचा ‘कायल जेमिसन’. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १५ कोटी रुपयांची बोली लावत जेमिसनला आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतले आहे. इतकी महागडी बोली लागल्यानंतर कुठलाही खेळाडू मौज मजा करू पाहतो. पण जेमिसनने जे केले ते ऐकून सर्वजण दंग राहिले.
१५ कोटींचा न्यूझीलंड डॉलर्समध्ये हिशोब लावण्यात गोंधळला जेमिसन
न्यूझीलंडच्या वेळेनुसार, लिलाव रात्री उशिरा सुरू होणार होता. यामुळे जेमिसनने लिलाव न पाहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याने अर्ध्या रात्री उठून पाहिले, तेव्हा त्याला १५ कोटी रुपयांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खरेदी करण्यात आल्याचे समजले. त्यांनतर त्याने भारतीय १५ कोटी रुपये, न्यूझीलंडच्या डॉलर्समध्ये किती रुपये होतील? याचा विचार करायला सुरुवात केली.
आनंदाची बातमी ऐकून जेमिसन झोपी गेला
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना जेमिसनने म्हटले की, “मी अर्ध्या रात्री उठलो आणि फोन घेण्याचा निर्णय घेतला. मला वाटलं होत की बसून या गोष्टीचा आनंद घेईल. परंतु दीड तास झाला माझे नाव आलेच नाही. मला शेन बॉन्ड याचा संदेश आला की, लिलाव कसा सुरु आहे. पण मला माहित नव्हते की, १५ कोटी न्यूझीलंडच्या डॉलर्समध्ये किती रुपये असतील?. या विचाराने मी गोंधळून गेलो. शेवटी मी निवड झाल्याची गोड बातमी सर्वात आधी माझ्या प्रेयसीला दिली. त्यांनतर माझ्या आई वडिलांना सांगितले. या गोष्टींना अवघे २ ते ३ मिनिटे लागली आणि त्यांनतर तो झोपी गेलो.
लिलावात १४ कोटींपेक्षा जास्त बोली लागलेले खेळाडू
आयपीएल २०२१च्या लिलावात ५ खेळाडूंवर १४ कोटींपेक्षा जास्तीची बोली लावण्यात आली. यात जेमिसनव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने १४.२५ कोटी खर्च करत आपल्या संघात सामाविष्ट करून घेतले. तर झाय रिचर्डसन याला १४ कोटी रुपयांची बोली लावत पंजाब किंग्स संघाने आपल्या संघात स्थान दिले. तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला तो दक्षिण आफ्रिकन संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस. मॉरिसला राजस्थान रॉयल्स संघाने तब्बल १६.२५ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईच्या अनुभवी शिलेदाराला खरेदी करत सहाव्यांदा जेतेपद जिंकण्यास तयार; पाहा रोहितची नवी पलटण
ख्रिस मॉरिसवर राजस्थानने विक्रमी बोली लावण्यामागे ‘हे’ होते कारण, खुद्द प्रशिक्षकानेच केला उलगडा