आयपीएल २०२१ (IPL 2021) चा दुसरा महागडा खेळाडू म्हणजेच न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने (kyle jamieson) यावर्षी आयपीएलमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी त्याला क्वारंटाईन आणि बायो बबलपासून दूर राहून घरी वेळ घालवण्यासाठी आणि त्याला त्याच्या खेळात सुधारणा करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याने न्युझीलंडच्या देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धेच्या प्लॅंकेट शील्डमध्ये ऑकलॅंडच्या सामन्याच्या अगोदर ही माहिती दिली आहे. जेमिसनला २०२१ च्या आयपीएल लिलावात राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोरने (RCB) १५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
जेमिसनसाठी २०२१ चा हंगाम काही खास नव्हता. त्याने आरसीबीसाठी ९ सामने खेळले असुन ९ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची एक विकेट आरसीबीला १.६६ कोटींना पडली होती. जेमिसन आता आयपीएल खेळणार नसून तो आगामी दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा- कामाच्या तानामुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे उपकर्णधार केएल राहुल पहिल्या वनडेत असेल अनुपस्थित
जेमिसनने एका क्रिडा संकेतस्थळाला सांगितले की, “मी हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे आहेत. मागच्या १२ महिन्यांमध्ये मी क्वारंटाइन आणि बायो बबलमध्ये खुप काळ घालवला आहे. पुढील १२ महिन्यांमध्ये मला माझ्या कुटूंबासोबत वेळ घालवायचा आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून नविन आहे. फक्त दोन वर्ष झाली आहेत मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन. त्यामुळे मला अधिक सराव करायचा आहे. मी सध्या ज्या स्तरावर असायला हव आहे, तेथे मी अजून पोहोचलो नाही. मला तिन्ही प्रकारांमध्ये खेळायचे असल्यास मला परिश्रम तर घ्यावेच लागतील.”
जेमिसनने फेब्रुवारी २०२० मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारताविरुद्ध आत्तापर्यंत १२ कसोटी, ५ एकदिवसीय आणि ८ टी२० सामने खेळले आहेत. आयपीएल सोडण्याबाबत बोलताना तो म्हणाला, “आयपीएल न खेळण्याचा निर्णय कठीण होता, मी याच्यावर खूप विचार केला पण मला माझ्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि मला माझ्या खेळावर लक्ष द्यायचे आहे.”
आयपीएल खेळण्याच्या अनुभवावर जेमिसन म्हणाला की, “मला नाही माहित आयपीएल सोडण्याचा अनुभव चांगला होता की वाईट होता. तो एक धडा आणि एक अनुभव होता. यामुळे माझ्या जिवनात अनेक बदल झाले आहेत.”
त्याच्या टी२० क्रिकेटमधील खेळाबाबत तो म्हणाला, “खेळादरम्यान अनेक परिस्थीती निर्माण होत असतात. मला वाटते की मला आता त्या चांगल्याप्रकारे समजल्या आहेत. मला माहित आहे माझा खेळ कोठे आहे आणि मला कोठे काम करण्याची गरज आहे. मागील १२ महिन्यांत मी चांगल्याप्रकारे टी२० क्रिकेट खेळलो आहे. त्याच्या मदतीने मी खुप काही शिकलो आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कामाच्या तानामुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे उपकर्णधार केएल राहुल पहिल्या वनडेत असेल अनुपस्थित