---Advertisement---

असा आहे भारत दौऱ्यासाठी १४ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ

---Advertisement---

जानेवारी 2020मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 3 वनडे सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 जणांचा संघ घोषित केला आहे.

या ऑस्ट्रेलिया संघात मार्नस लॅब्यूशानेला संधी मिळाली आहे. त्यामुळे आता त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते. लॅब्यूशाने सध्या शानदार लयीत आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत खेळताना दमदार कामगिरी केली आहे. त्याने यावर्षी खेळलेल्या 10 कसोटी सामन्यात 68.13 च्या सरासरीने 1022 धावा केल्या आहेत.

याबरोबरच ऑस्ट्रेलियाने 2019 विश्वचषकात खेळवलेल्या संघातील एकूण 7 खेळाडूंना भारत दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी मात्र संधी दिलेली नाही.

त्याचबरोबर भारताविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे नियमित मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड प्रभारी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेलने टी20 क्रिकेटमधून पुनरागमन केले आहे. पंरतू त्याला ऑस्ट्रेलियाने या वनडे संघात स्थान दिलेले नाही.

तसेच 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघात असलेल्या उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, नॅथन कुल्टर नाईल, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन लायन यांना भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात संधी दिलेली नाही. तसेच जेसन बेऱ्हेंडॉर्फ दुखापतीमुळे उपलब्ध नाही.

तसेच पर्यायी यष्टीरक म्हणून पीटर हँड्सकॉम्बची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर या संघात ऍश्टन अगार, ऍश्टन टर्नर आणि सीन ऍबॉट यांचाही समावेश करण्यात आला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 14 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका होईल. पहिला सामना 14 जानेवारीला मुंबईला होईल. तर दुसरा आणि तिसरा वनडे सामना अनुक्रमे 17 आणि 19 जानेवारीला राजकोट आणि बंगळूरु येथे पार पडेल.

असा आहे ऑस्ट्रेलिया संघ – 

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लॅब्यूशाने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ऍश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---