पुणे: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या स्पोर्ट्स एनजीओ ‘लक्ष्य’च्या वतीने 10वेळा टेबल टेनिसचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या शरथ कमल आणि एकेरी व दुहेरी गटातील वरिष्ठ राष्ट्रीय विजेती श्रीजा अकुला यांसह आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताच्या टेबल टेनिस संघात निवड झालेल्या अन्य खेळाडूंचा खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.
अनेकवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकवलेल्या आणि लक्ष्यचा मेंटॉर असलेल्या कमलेश मेहता यांच्या हस्ते व लक्ष्यचे अध्यक्ष सत्येन पटेल, माजी भारतीय पॅडलर सुनील बाब्रस यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडणार आहे.
लक्ष्य च्या वतीने पाठिंबा असलेल्या 17 वर्षाखालील व 19वर्षाखालील गटातील भारताची अव्वल टेबल टेनिस व ग्रुप चेवीयटचा पाठींबा असलेली जागतिक कुमार अजिक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकवणारी सुहानी सैनी, मिश्रा दुहेरीतील राष्ट्रीय विजेती व महिला दुहेरीत उपविजेती प्राप्ती सेन आणि 17 वर्षाखालील गटातील क्रमांक 3खेळाडू व 2021मध्ये 3 आंतरराष्ट्रीय कुमार स्पर्धांमध्ये पदके पटकवणारी शर्मिला दालमिया यांचा पाठिंबा लाभलेली पृथा व्हर्टीकर यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.
लक्ष्यचा पाठींबा असलेल्या शरथ कमल, ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचा पाठिंबा लाभलेली श्रीजा अकुला आणि मानसिक स्वास्थ्य, आहार व फिटनेस तपासणी, फिजिओ, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा अशा 360डिग्री स्वरूपात पाठिंबा लाभलेले अन्य सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ डेक्कन जिमखाना येथे रविवार, जून 5 रोजी दुपारी 12 होणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत खेळण्यासाठी ‘हा’ खेळाडू उत्सुक, वेळ दिल्याने बीसीसीआयलाही म्हटले थँक्यू
मिशेल आणि ब्लंडेल जोडीची विक्रमतोड भागीदारी, १८ वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती
पाकिस्तानला हरवत बक्षीस म्हणून मिळालेली ‘ऑडी १००’ पाहून शास्त्री भावूक, ३७ वर्षांनंतर पाहिली कार