आयसीसीनं नुकतीच फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली. यावेळी रँकिंगमध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे, पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला याचा मोठा फटका बसला. तर भारताच्या विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांना फायदा झाला आहे.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीवर नजर टाकली तर, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे 881 रेटिंग गुण आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत रुटची बॅट आग ओकत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यमसन आहे. त्याचे 859 रेटिंग गुण आहेत. न्यूझीलंडचाच डॅरिल मिशेल 768 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकनं क्रमवारीत मोठी झेप घेतली. तो आता थेट चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याला तीन स्थानांचा फायदा झाला. त्याचे 758 रेटिंग गुण आहेत. स्टीव्ह स्मिथ 757 च्या रेटिंगसह 5व्या आणि रोहित शर्मा 751 रेटिंगसह 6व्या स्थानावर कायम आहे. त्यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.
भारताचा यशस्वी जयस्वाल एका स्थानाची झेप घेऊन सातव्या क्रमांकावर पोहोचला. त्याचे 740 रेटिंग गुण आहे. तर विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो आता 737 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र या दोघांनीही दीर्घकाळापासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांना क्रमवारीत फायदा कसा झाला? याचं उत्तर बाबर आझमची झालेली घसरण आहे.
ताज्या क्रमावारीत बाबर आझमचं मोठं नुकसान झालं. त्याची तब्बल 6 स्थानांनी घसरण झाली. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बाबर आझम शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावातही तो केवळ 22 धावाच करू शकला. यामुळे त्याला नुकसान सोसावं लागलं.
बाबर आझमचे आता 734 रेटिंग गुण झाले असून तो 9व्या क्रमांकावर आहे. बाबर आझमला तोटा सहन करावा लागला असला तरी, त्याच्या देशाच्या मोहम्मद रिझवाननं सात स्थानांनी झेप घेतली आहे. रिझवान 728 रेटिंग गुणांसह 10व्या क्रमांकावर आहे. रिझवाननं बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात शतक झळकावलं होतं, ज्याचा त्याला फायदा झाला.
हेही वाचा –
ICC Champion’s Trophy 2025: जय शाह हिसकावून घेणार पाकिस्तानचे यजमानपद?
मोठी बातमी! इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
झहीर खान लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील होणार? मोठी अपडेट समोर