पुणे (18 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज ‘ब’ गटातील शेवटचा सामना लातूर विरुद्ध सातारा यांच्यात झाला. दोन्ही संघ प्रमोशन फेरीतून बाहेर पडल्याने त्याना रेलिगेशन फेरीत खेळावा लागणार आहे. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली होती. लातूरच्या प्रदिप आकांगिरे ने चतुरस्त्र चढाया करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर साताराच्या प्रथमेश माने व यश निकम यांनी गुण मिळवत सामन्यात चुरस आणली.
सातारच्या प्रथमेश मानेच्या आक्रमक खेळीने मध्यांतराला 17-08 अशी आघाडी मिळवली. हीच आघाडी मध्यांतरा नंतर वाढवून सातारा संघाकडे 14 गुणांची आघाडी होती. त्यानंतर मात्र लातूरच्या प्रदिप आकांगिरेच्या आक्रमक खेळीने सामन्याला कलाटणी दिली. प्रदीप आकांगिरेच्या सुपर टेन खेळीने शेवटचा 1 मिनिटं शिल्लक असताना लातूर संघाने आघाडी मिळवली.
लातूर संघाने अखेरच्या मिनिटाला आपली आघाडी कायम ठेवत सामना 33-30 असा जिंकला. प्रदिप आकांगिरे हा विजयाचा शिल्पकार ठरला, त्याने एकूण 14 गुण मिळवले. तर त्याला सोहेल शेख ने 6 गुण मिळवत चांगली साथ दिली. बचावफळीत प्रणव भाटिगिनी ने पकडीत एकूण 6 गुण मिळवले. सातारा कडून प्रथमेश माने ने सर्वाधिक 12 गुण मिळवले. (Latur team defeated Satara team in the match)
बेस्ट रेडर- प्रदिप आकांगिरे, लातुर
बेस्ट डिफेंडर- प्रणव भाटिगिनी, लातूर
कबड्डी का कमाल – प्रदिप आकांगिरे, लातुर
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी सूर्यकुमार यादव बाबत मोठी बातमी, जाणून व्हाल थक्क
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे 5 गोलंदाज कोण, अनेक दिग्गजांचाही समावेश; जाणून घ्या