दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (South Africa vs west indies) संघांमध्ये ४ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील चौथ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने वेस्ट इंडिज महिला संघावर ६ गडी राखून जोरदार विजय मिळवला. यासह वनडे मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू लॉरा वॉल्वार्ट (Laura wolvaardt) एका झेलमुळे चर्चेचा विषय ठरतेय. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिज महिला संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या वनडे सामन्यात सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ९६ धावांनी आणि चौथ्या वनडे सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. (Laura wolvaardt catch video)
मालिकेतील चौथ्या आणि अंतिम सामन्यात लॉरा वॉल्वार्टने एक भन्नाट झेल टिपला आहे. तिने डाव्या बाजूला डाईव्ह मारत, हवेत एका हाताने झेल टिपला. हा झेल पाहून फलंदाजासह, खेळाडू आणि पंच देखील आश्चर्यचकित झाले होते. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की, दक्षिण आफ्रिका संघातील दिग्गज खेळाडू जॉंटी रोड्सने (Jonty Rhodes) स्वतः हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
What a catch from Laura Wolvaardt🤩 #SAWvWIW #AlwaysRising #BePartOfIt pic.twitter.com/uiF4FUAd98
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 6, 2022
No more bulls***t give us more women’s cricket. Great grab @LauraWolvaardt #AlwaysRising #SAWvWIW #BePartOfIt https://t.co/JKkiAmRBkT
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) February 7, 2022
तर झाले असे की, वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी सुरू असताना, ३० वे षटक टाकण्यासाठी तुमी सेखुखुने गोलंदाजी करण्यासाठी आली होती. या षटकातील एका चेंडूवर फलंदाज मॅथ्यूजने कट शॉट मारला. त्यावेळी लॉरा वॉल्वार्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण करत होती. हा चेंडू लॉरा वॉल्वार्ट पासून भरपूर दूर होता. तरीदेखील तिने डाईव्ह मारली आणि एका हाताने भन्नाट झेल टिपला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल २०२२ साठी एमएस धोनीने कसली कंबर, सरावाचा व्हिडिओ व्हायरल
केएल राहुलचे होणार पुनरागमन, तर कुलचा जोडी खेळणार एकत्र, अशी असू शकते दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग ११
युवा विश्वचषकात चमकदार कामगिरीनंतरही भारताचा ‘हा’ खेळाडू नाही आयपीएल लिलावाचा भाग, वाचा कारण