इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबादवर 14 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 192 धावा केल्या होत्या. या सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. फलंदाजीत तिलक वर्माने, तर गोलंदाजीत अर्जुन तेंडुलकर चमकला.
कोलकाताविरुद्ध अर्जुनचे पदार्पण
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) त्याचा दुसरा सामना हैदराबादविरुद्ध खेळत होता. त्याने रविवारी (दि. 16 एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. कोलकाताविरुद्ध खेळताना त्याने 2 षटके गोलंदाजी करताना 17 धावा खर्च केल्या होत्या.
मात्र, पदार्पणाच्या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. आयपीएलमध्ये मुलाला खेळताना पाहणे नेहमीच यादगार क्षण असतो. असेच काहीसे अर्जुनचा वडील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासाठीही होते.
https://www.instagram.com/reel/CrH15P-OZjb/
मुलाला आयपीएलमध्ये खेळताना पाहून सचिन भावूक
मुलाला आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळताना पाहून सचिन तेंडुलकर याच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. खरं तर, हा खुलासा वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयान बिशप (Ian Bishop) यांनी केला. ते म्हणाले की, कोलकाताविरुद्ध जेव्हा अर्जुन मैदानावर उतरला, तेव्हा फ्लॉर मॅनेजरने सचिनसोबत चर्चा केली होती.
बिशप म्हणाले की, “मी त्यांचे नाव घेणार नाही. मात्र, ते म्हणाले की, जेव्हा अर्जुनने आयपीएलमध्ये पदार्पण केले, तेव्हा सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ‘जेव्हा मी आयपीएलमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी केली होती, तेव्हा मीदेखील माझ्या पहिल्या षटकात पाच धावा दिल्या होत्या. अर्जुननेही त्याच्या पहिल्या षटकात पाच धावा खर्च केल्या,’ असे सचिन फ्लोर मॅनेजरला म्हणाला.”
बिशप पुढे म्हणाले की, “सचिन हा अर्जुनने खेळलेले अनेक डाव विसरून जाईल, पण आयपीएलमध्ये अर्जुनने फेकलेले पहिले षटक तो कधीच विसरणार नाही.”
हैदराबादविरुद्ध अर्जुनची शानदार गोलंदाजी
हैदराबादला अखेरच्या षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने गोलंदाजीची जबाबदारी युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याच्याकडे सोपवली. अर्जुननेही ही जबाबदारी लीलया पार पाडली. अखेरच्या षटकात त्याने शानदार गोलंदाजी करत संघाला विजयच मिळवून दिला नाही, तर आयपीएल कारकीर्दीतील पहिली विकेटही घेतली. अर्जुनने भुवनेश्वर कुमार याच्या रूपात पहिली विकेट घेतली. त्याने शेवटच्या षटकात 6 धावा खर्च केल्या. या सामन्यात त्याने 2.5 षटके गोलंदाजी करताना 18 धावा खर्च करून 1 विकेट नावावर केली. (legend sachin tendulkar was in tears after seeing his son arjun tendulkar playing in ipl 2023 know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! सिराजकडे संघाची अंतर्गत माहिती मागत होता ड्रायव्हर, पैशाचे आमिष दाखवताच उचलले मोठे पाऊल
Video: अर्जुन तेंडुलकरचे खास अंदाजात पदार्पणाचे सेलिब्रेशन, मराठी गाण्यावर सहकाऱ्यांसोबत लावले ठुमके