भारतीय संघाचे महान खेळाडू सुनील गावसकर हे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023मधी अंतिम सामन्यात समालोचकाची भूमिका बजावणार आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान पार पडणार आहे. आता या सामन्यापूर्वी सुनील गावसकरांनी अजिंक्य रहाणेविषयी भाष्य केले. गावसकरांनी रहाणेच्या पुनरागमनाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. गावसकर म्हणालेत की, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात रहाणेकडे स्वत:ला सिद्ध करण्याची शानदार संधी आहे.
काय म्हणाले गावसकर?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी म्हटले की, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. तो भारतासाठी पाचव्या क्रमांकावर महत्त्वाचा ठरेल. 34 वर्षीय रहाणेला सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल. त्यांना असे वाटते की, रहाणेमध्ये अजून क्रिकेट शिल्लक राहिले आहे. ते आशा करत आहेत की, रहाणे दोन्ही हातांनी या संधीचा फायदा घेईल आणि भारतीय संघात दमदार पुनरागमन करेल.
गावसकर म्हणाले की, “इंग्लंडमध्ये खेळून, तिथे धावा करून, खूप अनुभव मिळाला आहे. त्यामुळे, हो मला वाटते की, तो पाचव्या क्रमांकावर महत्त्वाचा खेळाडू आहे. होय, मला विश्वास आहे की, त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे. मला आताही वाटते की, त्याच्यात आणखी बरेच क्रिकेट बाकी आहे आणि ही त्याच्यासाठी एक मोठी संधी आहे. मी आशा करत आहे की, तो या संधीचा फायदा आपल्या संपूर्ण अनुभवासोबत घेईल आणि भारतीय संघात आपली जागा बनवू शकेल.”
खरं तर, भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तिथे त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्वही केले. भारतीय फलंदाजाने आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठीही जबरदस्त प्रदर्शन केले. तिथे त्याने स्वत:ला टी20 क्रिकेट प्रकारात बदलले. रहाणेने आयपीएल 2023 स्पर्धेत 14 सामने खेळताना 32.60च्या सरासरीने 326 धावा चोपल्या. या धावा करताना त्याचा स्ट्राईक रेट हा 172.48 इतका होता. आता तो डब्ल्यूटीसी (WTC) अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (legend sunil gavaskar opined that ajinkya rahane has a point to prove return india team wtc 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता कशी आहे रिषभ पंतची तब्येत? ‘गब्बर’ने भेट घेऊन दिली अपडेट
CSKच्या सीईओंचा धोनीबाबत मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, ‘खरंय, तो गुडघ्याच्या दुखापतीसाठी…’