---Advertisement---

काय सांगता..! दिग्गज फुटबाॅलपटू रोनाल्डो एमएस धोनीचा चाहता?

Ronaldo And Dhoni
---Advertisement---

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हे क्रिकेट जगातील एक मोठं नाव आहे आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हे फुटबॉल विश्वातील मोठं नाव आहे. दोन्ही दिग्गज आपापल्या खेळात बाप आहेत. फुटबॉल हा जगभरात सर्वाधिक आवडला जाणारा खेळ आहे. या यादीत क्रिकेट दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून असा दावा केला जात आहे की, ख्रिस्तियानो रोनाल्डो देखील माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा चाहता आहे.

माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी 7 नंबरची जर्सी घालतो आणि रोनाल्डो देखील 7 नंबरची जर्सी घालतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोनाल्डच्या घरी 7 नंबरची जर्सी लटकलेली दिसत आहे. रोनाल्डोच्या घरातील 7 नंबरची जर्सी पाहून प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, रोनाल्डोही एमएस धोनीचा चाहता आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण व्हिडिओमध्ये रोनाल्डोच्या घरी लटकलेली जर्सी धोनीची नसून स्वत: रोनाल्डोचीच आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी20 सामने खेळले आहेत. 90 कसोटी सामन्यात त्यानं 38.09च्या सरासरीनं 4,876 धावा कल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 43 अर्धशतक आणि 6 शतक आहेत. 350 एकदिवसीय सामन्यात त्यानं 10,773 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 73 अर्धशतक आणि 10 शतक झळकावले. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 183 आहे. 98 टी20 सामन्यात धोनीनं 126.13च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना 1,617 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 56 राहिली, तर टी20 मध्ये त्यानं 2 अर्धशतक झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? व्हायरल व्हिडिओमुळे होतेय सडकून टीका
‘या’ 3 विदेशी खेळाडूंनी आयपीएलवर गाजवले वर्चस्व…!
धोनीबद्दल आम्ही असे काही बोललोच नाही; सीएसकेचे सीईओ विश्वनाथन यांचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---