लीजेंड्स क्रिकेट लीग ही निवृत्त खेळाडूंची स्पर्धा ओमानमध्ये २० जानेवारीपासून सुरु होणार असून नुकतीच संघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये तीन संघ दिसणार आहेत. भारताकडून या स्पर्धेत भारत महाराजा नावाचा एक संघ खेळणार असून त्या संघात वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू असणार आहेत.
युवराज सिंगने गेल्याच महिन्यात या स्पर्धेत सहभागी होण्याचं निश्चित केलं होते, तसेच मागच्याच महिन्यात हरभजन सिंगचाही संघात समावेश करण्यात आला होता. अगोदर या स्पर्धेत सचिन तेंडूलकरची सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण नंतर तेंडूलकर या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे समोर आले.
या स्पर्धेत भारताशिवाय शेष विश्व एकादश आणि आशिया लायन्सचे संघही दिसणार आहेत. शोएब अख्तर, सनथ जयसूर्यासारखे दिग्गज खेळाडू आशियाकडून खेळताना दिसणार आहे. तीन संघात होणारी ही स्पर्धा खूपच रंजक हेण्याची अपेक्षा आहे. सर्व संघांची घोषणा करण्यात आली आहे.
भारत महाराजा संघ
वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमंग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगड, नयन मोंगिया, अमित भंडारी या खेळाडूंना भारत महाराजा संघात निवडण्यात आले आहे.
अधिक वाचा – खुद्द ब्रँड अँबेसेडर अमिताभ यांनाही मिळाली चुकीची माहिती, ‘या’ लीगमध्ये सहभागी नाही होणार सचिन
भारत महाराजा संघाचे संचालक माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री आहेत. ही स्पर्धा सुरु होण्याची घोषणा झाल्यानंतर रवी शास्त्री आशिया लायन्स संघाच्या खेळाडूंबद्दल बोलताना म्हणाले होते की, “एका संघातील सर्व खेळाडू विरोधी पक्षातील खेळाडूंना धावांसाठी धावायला लावतील. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो संघ चॅम्पियन आहे. आफ्रिदी, मुरली, चामिंडा वास आणि शोएब मलिक एकाच संघात खेळताना दिसणार आहेत.
व्हिडिओ पाहा – द्रविडला ‘जॅमी’ टोपणनाव पडलं तरी कसं?
भारत महाराजा संघाशिवाय आशिया लायन्सच्या संघातही दिग्गज खेळाडूची नावे आहेत. या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज माजी खेळाडू खेळताना दिसणार असून त्यांचा भारतीय संघाविरुद्धचा सामना पाहणे रंजक ठरणार आहे. पाकिस्तानचे दोन स्टार खेळाडू वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी हे श्रीलंकेच्या खेळाडूंसह आशिया लायन्स संघात दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅप्टन्स इनिंग! विराटने कसोटी कर्णधार असताना केलेल्या ‘या’ ५ खेळी विसरणे अशक्यच
आयपीएल न खेळता ‘हे’ ३ क्रिकेटपटू करू शकतात भारतीय संघात पदार्पण