लीजेंड्स लीग क्रिकेट 2022 स्पर्धेचे बिगूल वाजले असून या स्पर्धेतील उद्घाटन सामना इंडिया महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स संघात खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी बरोबरीचे प्रदर्शन केले. इंडिया महाराजाकडून खेळाडूंनी गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार प्रदर्शन करत 6 विकेट्स राखून सामना जिंकला. 5 विकेट्स हॉल घेणारा पंकज सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या सामन्यात (India Maharaja vs World Gaints) प्रथम फलंदाजी करताना वर्ल्ड जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकात 8 बाद 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंडिया महाराजा संघाने 18.4 षटकातच वर्ल्ड जायंट्सचे आव्हान पूर्ण केले.
वर्ल्ड जायंट्सच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया महाराजा संघाकडून युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि तन्मय श्रीवास्तव यांनी मॅच विनिंग प्रदर्शन केले. तन्मयने 39 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. युसूफ पठाणनेही 35 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद अर्धशतक ठोकले. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली. तसेच इरफान पठाणने 9 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 20 धावांची झंझावाती खेळी केली.
Now that was a #Legendary performance by #PankajSingh
as he wins #BossOfTheMatch by taking 5 wickets! #LegendsLeagueCricket #BossLogoKaGame #BossGame #LLCT20 pic.twitter.com/fI8sdMwWix— Legends League Cricket (@llct20) September 16, 2022
या खेळींच्या जोरावर इंडिया महाराजा संघाने 8 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या डावात वर्ल्ड जायंट्सकडून टीम ब्रेसननने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच फिडेल एडवर्ड्स यानेही 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना वर्ल्ड जायंट्सकडून सलामीवीर केविन ओ ब्रायनची बॅट चांगलीच तळपली. त्याने 31 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकार मारत 52 धावांची वादळी खेळी केली. तसेच दिनेश रामदिनने 29 चेंडूत नाबाद 42 धावांची शानदार खेळी केली. 1 षटकार आणि 5 चौकार मारत त्याने ही खेळी केली. मात्र या दोघांचीही खेळी व्यर्थ ठरली.
या डावात इंडिया महाराजाकडून 8 खेळाडूंनी गोलंदाजी केली. मात्र पंकज सिंगने (Pankaj Singh) सर्वांना प्रभावित केले. 4 षटके फेकताना 26 धावा देत त्याने 5 गडी बाद केले. त्याच्या या शानदार प्रदर्शनाचे कौतुक त्याला सामनावीर पुरस्कार देत करण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी
व्हायचे होते वेगवान गोलंदाज झाला जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज
टीम इंडियामध्ये एंट्री करताच ‘या’ खेळाडूने शतकी खेळी करत केला जल्लोष





