लिजेंड्स लीग क्रिकेट 2024 चा 12 वा सामना कोर्नक सूर्या ओडिशा विरुद्ध सदर्न सुपर स्टार्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये सदर्न सुपर स्टार्सने कोर्नक सूर्याचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोर्नाक सूर्याने निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 192 धावा केल्या. सदर्न सुपर स्टार्सने हे लक्ष्य 16 षटकांत केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले. सुपर स्टार्सकडून सलामीवीर मार्टिन गप्टिलने झंझावाती शतक झळकावले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोर्नक सूर्या ओडिशाने चांगली सुरुवात केली. रिचर्ड लेव्ही आणि जेसी रायडर या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी केवळ 4.5 षटकांत 76 धावा जोडल्या. ज्यात रिचर्ड लेव्हीने केवळ 21 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. तर जेसी रायडरने 18 चेंडूत 18 धावा केल्या. मधल्या फळीत युसूफ पठाणने 22 चेंडूत 33 धावांची खेळी खेळली पण कर्णधार इरफान पठाणला केवळ 10 धावा करता आल्या. . सुपर स्टार्सकडून सुबोध भाटीने 2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सदर्न सुपर स्टार्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अवघ्या 34 धावांच्या स्कोअरवर संघाला पहिला धक्का बसला. कर्णधार श्रीवत्स गोस्वामी 15 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर मार्टिन गप्टिलने एकहाती दमदार शतक झळकावत संघाला विजयाकडे नेले. त्याने केवळ 54 चेंडूत 11 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 131 धावांची नाबाद खेळी खेळली. तसेच पवन नेगी 11 चेंडूत 14 धावा करून नाबाद राहिला. कोर्नाकचा गोलंदाज नवीन स्टीवर्टने अवघ्या 2 षटकांत 63 धावा दिल्या.
VINTAGE MARTIN GUPTILL. 🔥
6,6,6,4,6,6 – 34 runs in a single over in the LLC. 🤯 pic.twitter.com/0LG9g55Lry
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 2, 2024
या विजयानंतर सदर्न सुपर स्टार्सने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे. संघाने आतापर्यंत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर इंडिया कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आणि कोर्नाकचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा-
महिला टी-20 वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात; मॅच टाइमिंग, लाइव्ह स्ट्रिमिंगपासून सर्वकाही जाणून घ्या
रोहित शर्मा की एमएस धोनी, भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण? हरभजन सिंग म्हणाला…
‘या’ 26 वर्षीय खेळाडूला आयसीसीने 1 वर्षासाठी केलं बॅन!