वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान या दोन्ही संघात २८ जुलै रोजी पहिला टी२० सामना खेळवण्यात आला. यादरम्यान, वेस्ट इंडिज संघाच्या एका फलंदाजाच्या मानेला दुखापत झाल्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम याने टाकलेला चेंडू वेस्ट इंडीजचा फलंदाज लेंडल सिमंस याच्या मानेवर जाऊन लागला होता.
यानंतर सिमंस मैदानावर कोसळला. त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याला अर्ध्यातूनच मैदानातून बाहेर जावे लागले. वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान दुसर्या षटकातच ही घटना घडली होती. सिमंसला झालेली दुखापत ही गंभीर होती. जेव्हा तो मैदानातून बाहेर जात होता, तेव्हा त्याला त्याचा उजवा हात स्लिंगच्या मदतीने लटकत होता.
असे सांगितले जात आहे की, चेंडू लागल्यामुळे तो कन्कशनचा शिकार झाला आहे. त्यामुळे त्याला चालू सामन्यातून बाहेर जावे लागले. सिमंसला गोलंदाजी करत असलेला गोलंदाज मोहम्मद वसीमचा हा पदार्पणातील आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता. वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर सिमंसने चौकार लगावला होता. त्यानंतर मोहम्मद वसीमने दुसरा चेंडू बाउन्सर टाकला होता आणि वेस्ट इंडिजचा सिमंस त्याच चेंडूवर अडकला. हा चेंडू १४१.२ किलोमीटर प्रति तास वेगाने टाकला होता. हा चेंडू सिमंसच्या मानेवर जाऊन जोराने लागला आणि तो खाली पडला.
Lot happening in the 1st T20I between West Indies and Pakistan! A nasty 141.2 kph bouncer by Mohammad Wasim has sent Lendl Simmons off the field and then Hassan Ali takes out Evin Lewis
WI 24/1 (2.5) CRR: 8.47#WIvPAK pic.twitter.com/NqigDvmEv1
— PakPassion.net (@PakPassion) July 28, 2021
जेव्हा सिमंस खाली पडला तेव्हा हे सर्व पाहून मैदानात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे खेळाडू देखील घाबरलेले दिसून येत होते. सिमंसला खाली पडलेला पाहून फिजिओ लगेच मैदानात पळत आले. महत्वाचे म्हणजे सिमंसनंतर शुद्धीवर आला. त्याला शुद्धीवर आल्याचे पाहून सर्वांनाच आनंद झाला होता. परंतु नंतर त्याला रिटायर्ड हर्ट करण्यात आले.
२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिल ह्यूजेससारखीच दुखापत लेंडल सिमन्सलाही झाली होती. ह्यूजच्या गळ्याच्या वरच्या भागावर चेंडू लागला होता. नंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
त्याचबरोबर पहिल्या टी२० सामन्यादरम्यान पावसाने व्यत्यय आणला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही. संततधार पावसानंतर जेव्हा मध्ये वेळ मिळाला, तेव्हा ९-९ षटकांचा सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये वेस्ट इंडिजने ५ गडी बाद ८५ धावा केल्या होत्या. दरम्यान कर्णधार कायरन पोलार्डने ९ चेंडूत २२ धावा केल्या. पोलार्डने शेवटच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीला षटकार ठोकला. पण पाऊस पुन्हा आला आणि पाकिस्तानची फलंदाजी होऊ शकली नाही. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. ४ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ३१ जुलै रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम टी२० सामन्यानंतर शनाका अन् संघाने घेतली कर्णधार धवनची भेट, ‘या’ विषयावर झालं बोलणं
श्रीलंका मोहिमेवरून ‘धवनसेने’ची मायदेशी रवानगी, कृणालसह तिघे श्रीलंकेतच; पण सूर्या-पृथ्वीचं काय?
बाय बाय डरहॅम! पहिल्या कसोटीसाठी नॉटिंघमला रवाना झाली विराटसेना, ‘या’ मैदानावर करणार सराव