आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी लियाम लिव्हिंगस्टोनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्फोटक खेळी खेळली आहे. त्याची ही खेळी आयपीएल संघांसाठी धोक्यापेक्षा कमी नाही. लिव्हिंगस्टोनने कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आतशी फटकेबाजी केली. लिव्हिंगस्टोनने 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या आहेत. लिव्हिंगस्टोनला त्याच्या शानदार कामगिरीमुळे समानावीर खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. तो सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा भाग आहे.
टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 194 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत 7 गडी गमावून सामना जिंकला. सामन्यात लिव्हिंगस्टोन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 47 चेंडूत 87 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. लिव्हिंगस्टोनचा स्ट्राइक रेट 185.11 होता. त्याच्यासोबत जेकब बेथेलनेही धावा केल्या. त्याने 24 चेंडूत 44 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना 3 विकेटने जिंकला.
Never get sick of watching Liam Livingstone slog. Absolute monster of a slogger pic.twitter.com/1xE3xfQ28F
— T-Bag (@TheodRRRe) September 14, 2024
आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. डिसेंबर महिन्यात त्याचे आयोजन केले जाऊ शकते. याआधी अनेक संघ खेळाडूंना सोडतील. तर फक्त काही खेळाडूंना कायम ठेवता येईल. लिव्हिंगस्टोन सध्या पंजाब किंग्जचा भाग आहे. त्याला पंजाबने 2022 मध्ये 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले. आणि संघाने त्याला 2024 पर्यंत त्याला कायम ठेवले. पण आगामी हंगामासठी त्याला संघात ठेवणार की बाहेर करणार हे पाहणे रंजक राहील. जर लिव्हिंगस्टोन लिलावात आला तर त्याला मोठी रक्कम मिळू शकते. याची शक्यता नाकारता येत नाही.
लिव्हिंगस्टोनची आयपीएल कारकीर्द फार मोठी नाही. पण त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये 2019 मध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 39 सामने खेळले आहेत. यादरम्यान 939 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये लिव्हिंगस्टोनने 6 अर्धशतके केली आहेत. गोलंदाजीतही त्याने कमाल दाखवली आहे. लिव्हिंगस्टोनने आयपीएलच्या 22 डावांमध्ये गोलंदाजी केली आहे. या दरम्यान त्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा-
कपिल शर्माच्या शोमध्ये रोहितसह दिसणार भारताचे हे वर्ल्डकप विजेते स्टार्स! प्रोमो व्हिडिओ लॉन्च
IND VS BAN: 92 वर्षात पहिल्यांदाच असे घडणार, भारतीय संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
गोलंदाजी प्रशिक्षक बनल्याची बातमी मिळताच मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया काय होती?, भारतीय संघात येताच केला मोठा खुलासा