---Advertisement---

लग्न रद्द करून आयपीएल-रणजीत चमकला, भारतीय संघात जागा मिळवली पण प्रशिक्षकांचा विश्वास जिंकणे बाकी

On: शुक्रवार, फेब्रुवारी 3, 2023 11:54 PM
Rajat Patidar
---Advertisement---

सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मानाची रणजी ट्रॉफी खेळली जात आहे. रणजी ट्रॉफी 2023 चे क्वॉर्टर फायनल सामने सध्या सुरू आहेत. गतविजेता मध्य प्रदेश संघ यावर्षी देखील उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात मुध्य प्रदेश संघाने आंध्र प्रदेशला 5 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यातील दुसऱ्या डावात रजत पाटीदार याने अर्धशतक ठोकले. तो सलग दुसऱ्या रणजी हंगामात संघासाठी अशाप्रकारे महत्वपूर्ण प्रदर्शन करत आहे.

रजत पाटीदार (Rajat Patidar) याच्यासाठी मागचे वर्ष खूपच खास राहिले. आयपीएल 2022 साठी झालेल्या मेगा लिलावात त्याला एकाही संघाने खरेदी केले नव्हते. पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा खेळाडू लवनीत याला दुखापत झाल्याने त्याने आयपीएल हंगामातून माघार घेतली. लवनीतला झालेली दुखापत रजत पाटीदारसाठी फायद्याची ठरली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने पाटीदारला लवनीतच्या जागी ताफ्यात जोडले आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला.

आयपीएल खेळण्याची संधी मिळाल्यामुळे रजत पाटीदार याने त्याचे लग्न देखील टाळले. त्याच्या कुटुंबियांनी लग्नासाठी हॉटेल देखील बुक केले होते. 29 वर्षांच्या रजत पाटीदारने आरसीबीकडून खेळताना भेदक फलंदाजी केली. एलिमिनेटर सामन्यात त्यांनी 54 चेंडूंमध्ये नाबाद 112 धावा केल्या होत्या. क्वालिफायर दोनमध्ये पाटीदारच्या बॅठमधून 42 चेंडूत 58 धावा निघाल्या. असे असले तरी, आरसीबीला यावर्षी देखील आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. आयपीएलच्या या हंगामात पाटीदारने 8 सामन्यांमध्ये 56 च्या सरासरीने 333 धावा कुटल्या. यामध्ये एक शतक, तर 2 अर्धशतकांचा ठोकले. स्ट्राईक रेट 153 चा राहिला. त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पाटीदारने कमाल प्रदर्श केले आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) संघाला पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून दिले.

रजत पाटीदारने रणजी ट्रॉफीच्या मागच्या हंगामात उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात अर्धशतक ठोकले. एवढेच नाही तर अंतिम सामन्यात मुंबई संघाविरुद्ध त्याने शतकीय खेळी केली. त्याने रणजीच्या मागच्या हंगामात खेळलेल्या 6 सामन्यांमधील 9 डावांमध्ये 82 च्या सरासरीने 658 धावा कुटल्या. यात 2 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता. रजत पाटीदारला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी आणि त्यापूर्वीही भारतीय संघात सामील केले गेले होते. पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, संघाचा कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला नसल्यामुळे अजून भारतासाठी त्याला खेळता आले नाहीये.

रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातील त्याचे प्रदर्शन पाहिले तर ते जबरदस्त म्हणता येईल. उपांत्यपूर्व सामन्यात जिंकण्यासाठी आंध्र प्रदेशकडून मध्ये प्रदेशला (Madhya Pradesh vs Andra Pradesh) 245 धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात पाटीदारने 55 धावांची खेळी केली. मध्य प्रदेशला सलग दुसऱ्यांता रणजी ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. (Like last season, this year’s Ranji season too, Rajat Patidar has been doing amazing for the Madhya Pradesh team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका! महत्वाचा अष्टपैलू खेळणार नसल्याचे कर्णधार कमिन्सकडून संकेत
दादा धोनीवर सोपवणार मोठी जबाबदारी! सुपर किंग आणि प्रिंस ऑफ कोलकाताच्या भेटीचा फोटो व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---