दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यांच्यात नेहमीच तुलना होत असते. यांच्याबद्दल अनेक तज्ञांनी विविध मते मांडली आहेत. रोनाल्डो आणि मेस्सीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही(Virat Kohli) विचारण्यात आले होते.
याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विराट म्हणाला, ‘कठिण प्रश्न आहे. पण मी क्रिस्तियानोची निवड करेल. तो मी पाहिलेल्यांपैकी परिपूर्ण खेळडू आहे. उजव्या पायाने खेळणे असो किंवा डाव्या, त्याचा वेग आणि ड्रिबलिंग कौशल्य अफलातून आहे. मी त्याच्यापेक्षा चांगला गोल स्कोरर पाहिला नाही.’
‘ही (रोनाल्डो) माझी वैयक्तिक पंसत आहे. मेस्सी हा देखील शानदार आहे. त्याच्याकडे नैसर्गिक कौशल्य आहे. त्याची क्षमताही चांगली आहे.’
‘माझ्यासाठी खेळातील प्रत्येक मिनीटाला चांगला खेळ करण्यासाठी असणारी जिद्द आणि क्षमता महत्त्वाची आहे. रोनाल्डोला हेच सर्वांपेक्षा वेगळे बनवते. उच्च स्तरावर खेळणाऱ्या सर्वांकडेच कौशल्य असते. पण मला वाटत नाही त्याच्याकडे जशी जिद्द आहे ती कोणाकडे असेल.’
काही दिवसांपूर्वी नुकतेच मेस्सीने रोनाल्डोला मागे टाकत सहाव्यांदा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सौरव गांगुली म्हणतो, या खेळाडूंना टीम इंडियात परत सामील करुन घ्या
–रिषभ पंतबद्दल प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मोठे भाष्य, म्हणाले…
–…तर कर्णधार विराट कोहलीवर ओढावू शकते बंदीची नामुष्की