पुणे। लायन्स क्लब ऑफ रहाटणी आणि लिओ क्लब ऑफ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन्स क्लब ऑफ रहाटणी करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने एम.जी स्पोर्टस् क्लब संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
हजारे मैदान, मोशी येथे झालेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत निलय गुरवच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने एम.जी स्पोर्टस् क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना निलय गुरव, आर्यन यादव व यश सुर्यवंशी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एम.जी स्पोर्टस् क्लब संघ 24.2 षटकात सर्वबाद 84 धावात गारद झाला. 84 धावांचे लक्ष प्रथमेश वाघमारेच्या नाबाद 36 व आयुष म्हाळसकरच्या नाबाद 27 धावांसह परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 15.3 षटकात 1 गडी गमावत 85 धावांसह सहज पुर्ण करत विजेतेपद पटकावले. 19 धावात 3 गडी बाद करणारा निलय गुरव सामनावीर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रांतपाल एमजेएफ लायन हेमंत नाईक, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन (स्पोर्ट्स) लायन संतोष गायकवाड, झोन चेअरपर्सन एमजेएफ लायन धनराज मंघनानी, लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीचे अध्यक्ष लायन प्रमोद भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष लायन धिरज कदम , लिओ क्लबचे अध्यक्ष लायन श्रेयस चव्हाण, क्लबचे संस्थापक एमजेएफ लायन वसंत कोकणे, सचिव लायन अमोल दापूरकर, खजिनदार लायन प्रशांत तेलंगे, कॅबिनेट ऑफिसर लायन समीरज अगरवाल, लायन अभिषेक मोहिते, फय्याज लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-अंतिम फेरी
एम.जी स्पोर्टस् क्लब- 24.2 षटकात सर्वबाद 84 धावा(अरोन गायकवाड 25(37, 2×4), आरोश बन्सल 18(24, 3×4), निलय गुरव 3-19, आर्यन यादव 2-9, यश सुर्यवंशी 2-7, वेदांत जाधव 1-10) पराभूत वि परंडवाल क्रिकेट अकादमी- 15.3 षटकात 1 बाद 85 धावा(प्रथमेश वाघमारे नाबाद 36(26, 7×4), आयुष म्हाळसकर नाबाद 27(49, 2×4), हर्षिल सावंत 1-28) सामनावीर- निलय गुरव
परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.
इतर पारितोषिके-
मालिकावीर- हर्षिल सावंत(एम्.जी स्पोर्टस् क्लब- 5 सामने, 60 धावा, 11 गडी बाद)
सर्वोत्कृष्ट फलंदाज- प्रय़मेश वाघमारे(परंडवाल क्रिकेट अकादमी- 6 सामने, 222 धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- पार्थ सोनवणे(चंद्रोज क्रिकेट अकादमी- 5 सामने 10 गडी बाद)
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक- सम्यक फिरोदिया(एम्.जी स्पोर्टस् क्लब)
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक- शुभम सुपे(परंडवाल क्रिकेट अकादमी)