---Advertisement---

बापरे! आयपीएलचा एकमेव संघ, ज्यानी आतापर्यंत एक दोन नव्हे तब्बल १२ कर्णधार बदलले

On: सोमवार, सप्टेंबर 21, 2020 12:53 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दूसरा सामना काल (२० सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात खेळण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ८ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघानेही २० षटकात ८ बाद १५७ धावा केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने २ विकेट्स गमावत २ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने ४ धावा करत हा सामना आपल्या नावावर केला.

या सामन्यात केएल राहुल पहिल्यांदा किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्त्व करत होता. तो पंजाबचा १२ वा कर्णधार ठरला. यासह पंजाब हा आयपीएल इतिहासातील पहिला असा संघ बनला आहे, ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक कर्णधार बदलले आहेत. राहुलपुर्वी तब्बल ११ खेळाडूंनी पंजाबचे नेतृत्त्व केले आहे. तर पंजाबनंतर सर्वाधिकवेळा कर्णधार बदलणाऱ्या संघांच्या यादीत दिल्ली कॅपिटल्सचे नाव दूसऱ्या क्रमांकावर येते. दिल्ली संघाने आतापर्यंत एकूण ११ कर्णधार बदलले आहेत.

तर मुंबई इंडियन्स व सनराइजर्स हैद्राबाद यांनी प्रत्येकी ७ वेळा आणि आयपीएलमधून बाहेर पडलेल्या पुणे वॉरियर्स इंडियाने ६ वेळा कर्णधार बदलले आहेत. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने देखील आतापर्यंत ६ वेळा कर्णधार बदलले आहेत. याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायन्स आणि कोची टस्कर्स केरळ हे संघ आहेत, ज्यांनी सर्वात कमी वेळा म्हणजे २ वेळा आपले कर्णधार बदलले आहेत.

पहा आयपीएलच्या सर्व संघांच्या कर्णधारांची यादी 

किंग्स इलेव्हन पंजाब – १२ कर्णधार

ऍडम गिलख्रिस्ट, जॉर्ज बेली, युवराज सिंग, आर अश्विन, ग्लेन मॅक्सवेल, कुमार संगकारा, डेव्हिड हसी, मुरली विजय, डेविड मिलर, माहेला जयवर्धने, विरेंद्र सेहवाग, केएल राहुल.

दिल्ली कॅपिटल्स – ११ कर्णधार

विरेंद्र सेहवाग, श्रेयस अय्यर, झहीर खान, गौतम गंभीर, जेपी डुमिनी, माहेला जयवर्धने, केविन पीटरसन, दिनेश कार्तिक, जेम्स होप, करुण नायर, डेव्हिड वॉर्नर.

मुंबई इंडियन्स – ७ कर्णधार 

रोहित शर्मा, सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, रिकी पाँटिंग, शॉन पोलॉक, ड्वेन ब्रावो, कायरन पोलार्ड

सनराइजर्स हैद्राबाद – ७ कर्णधार 

डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, शिखर धवन, कुमार संगकारा, कॅमरन व्हाइट, भुवनेश्वर कुमार, डॅरेन सॅमी

पुणे वॉरियर्स इंडिया – ६ कर्णधार

सौरव गांगुली, युवराज सिंग, ऍरॉन फिंच, एंजिलो मॅथ्यूस, स्टिव्ह स्मिथ, रॉस टेलर.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – ६ कर्णधार 

विराट कोहली, अनिल कुंबळे, डेनियल व्हिटोरी, राहुल द्रविड, केविन पिटरसन, शेन वॉटसन.

राजस्थान रॉयल्स – ५ कर्णधार

डेव्हि वॉर्नर, राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे, शेन वॉटसन, स्टिव्ह स्मिथ.

कोलकाता नाईट रायडर्स – ४ कर्णधार 

गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्यूलम.

डेक्कन चार्जर्स – ४ कर्णधार 

ऍडम गिलख्रिस्ट, कुमार संगकारा, व्हिव्हिएस लक्ष्मण, कॅमरन व्हाइट.

राइजिंग पुणे सुपरजायंट्स – ३ कर्णधार

स्टिव्ह स्मिथ, एमएस धोनी, अजिंक्य रहाणे.,

चेन्नई सुपर किंग्स – २ कर्णधार

एमएस धोनी, सुरेश रैना.

गुजरात लायन्स – २ कर्णधार

सुरेश रैना, ब्रेंडन मॅक्यूलम.

कोची टस्कर्स केरळ – २ कर्णधार

माहेला जयवर्धने, पार्थिव पटेल.

महत्त्वाच्या बातम्या –

कोल्हापूरात रोहित- धोनी फॅन्सची कुस्ती रंगात

आज आयपीएलमध्ये विराट, विलियम्सनसह या खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी

दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण; आणखी एक मोठा खेळाडू झाला जखमी

ट्रेंडिंग लेख –

१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?

मुंबई इंडियन्स संघात असूनही कधीच खेळण्याची संधी न मिळालेले ६ स्टार खेळाडू

आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वात खराब गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---