आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे क्रिकेटचा समावेश १९७१ साली करण्यात आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण ४३०० पेक्षा अधिक वनडे सामने पार पडले आहेत. ५० षटकांच्या या सामन्यात अनेक फलंदाजांनी मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. यासह असेही अनेक फलंदाज ठरले, कमनशिबी ठरले आणि नर्व्हस ९० मध्ये बाद झाले.
नर्व्हस नाइंटी म्हणजे फलंदाज ९९ धावांवर बाद होऊन जातो. वनडे क्रिकेटचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत ३४ वेळेस असे घडले आहे, जेव्हा फलंदाज ९९ धावांवर बाद होऊन माघारी परतला. तर १५ वेळेस असे ही झाले जेव्हा फलंदाज ९९ धावांवर नाबाद राहिले आणि शतक साजरे करू शकले नाही.
भारतीय संघाकडून वनडेत ९९ धावांवर बाद होणारे फलंदाज
१) कृष्णमाचारी श्रीकांत विरुद्ध इंग्लंड, २७ डिसेंबर,१९८४
२) व्हिव्हिएस लक्ष्मण विरुद्ध वेस्टइंडीज, ९ नोव्हेंबर २००२
३) राहुल द्रविड़ विरुद्ध पाकिस्तान, २३ मार्च २००४
४) सचिन तेंडूलकर विरुद्ध दक्षिण अफ्रीका, २६ जून २००७
५) सचिन तेंडुलकर विरुद्ध इंग्लंड, २४ ऑगस्ट २००७
६) सचिन तेंडुलकर विरुद्ध पाकिस्तान, ८ नोव्हेंबर २००७
७) विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज, २४ नोव्हेंबर, २०१३
८) रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २३ जानेवारी, २०१६
भारतीय संघाव्यतिरिक्त वनडे क्रिकेटमध्ये ९९ धावांवर बाद होणाऱ्या फलंदाजांची यादी
१)ज्योफ्री बॉयकॉट विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २० ऑगस्ट १९८०
२)एलन लॅंप विरुद्ध भारत, ४ जून १९८२
३)क्रिस ब्रॉड विरुद्ध पाकिस्तान,२१ मे १९८७
४)रमीज़ राजा विरुद्ध इंग्लंड, २० नोव्हेंबर १९८७
५)लांस क्लूजनर विरुद्ध श्रीलंका, ९ नोव्हेंबर १९९७
६) रोमश कालूवितरणा विरुद्ध झिम्बाब्वे, १८ डिसेंबर ,१९९९
७) मॅथ्यू हेडन विरुद्ध भारत, २५ मार्च २००१
८) सनथ जयसूर्या विरुद्ध भारत, ५ ऑगस्ट २००१
९) ग्रॅमी स्मिथ विरुद्ध श्रीलंका, २९ नोव्हेंबर २००२
१०) सनथ जयसूर्या विरुद्ध इंग्लंड, १७ जानेवारी २००३
११) ॲडम गिलक्रिस्ट विरुद्ध श्रीलंका, ७ मार्च २००३
१२) स्टीफन फ्लेमिंग विरुद्ध इंग्लंड, ४ जुलै २००४
१३) अँड्र्यू फ्लिंटॉफ विरुद्ध भारत, ३ डिसेंबर २००४
१४) ख्रिस गेल विरुद्ध बांग्लादेश, १५ डिसेंबर २००४
१५) ओएन मॉर्गन विरुद्ध स्कॉटलॅंड,५ ऑगस्ट २००६
१६) जेपी ड्यूमिनी विरुद्ध आयर्लंड, १५ मार्च २०११
१७) तिलकरत्ने दिलशान विरुद्ध दक्षिण अफ्रीका, ३१ जुलै २०१३
१८) जोस बटलर विरुद्ध वेस्टइंडीज, ५ मार्च २०१४,
१९) ल्यूक रोंकी विरुद्ध दक्षिण अफ्रीका, २१ ऑक्टोबर २०१४
२०) एबी डिविलियर्स विरुद्ध यूएई, १२ मार्च २०१५
२१) चामू चिभाभा विरुद्ध पाकिस्तान, २९ मे २०१५
२२) कुसल परेरा विरुद्ध वेस्टइंडीज, ४ नोव्हेंबर २०१५
२३) ॲलेक्स हेल्स विरुद्ध दक्षिण अफ्रीका, ६ फेब्रुवारी २०१६
२४)पॉल स्टर्लिंग विरुद्ध अफगानिस्तान, १९ मार्च २०१७
२५) मुशफिकुर रहीम विरुद्ध पाकिस्तान,२६ डिसेंबर २०१८
२६) बेन स्टोक्स विरुद्ध भारत, २६ मार्च २०२१
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023: जड्डूसाठी चेन्नई सुपर किंग्जची ‘हटके’ पोस्ट! प्रचंड व्हायरल होत असून एकदा पाहाच
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…