मंगळवारी बीसीसीआयला दिग्गज रॉजर बिन्नी यांच्यारूपात नवीन अध्यक्ष मिळाले. सौरव गांगुली मागच्या तीन वर्षात बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपात कामकाज पाहत होते. पण आता त्यांना हे पद खाली करावे लागले. मंगळवारी मुंबईतीली बीसीसीआयच्या मुख्यालयात सर्वांच्या एकमताने रॉजर बिन्नी बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. आतापर्यंत एकूण 40 वेळा बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी नियुक्ती केली गेली आहे. तर एकूण 35 लोकांनी ही जबाबादीरा पार पाडली आहे. बिन्नी ही जबाबदारी घेणारे 36 वे व्यक्ती आहेत.
- आर. ई. ग्रांत गोवन (R.E. Grant Govan) – 1928 ते 1933
- श्री सिकंदर हयात खान (Sir Sikandar Hayat Khan) – 1933 ते 1935
- नवाब हमिदुल्हा खान (Nawab Hamidullah Khan) – 1935 ते 1937
- महाराजा के. एस. दिग्विजयसिंह (Maharaja K.S. Digvijaysinhji) – 1937 ते 1938
- पी. सुब्रमन्यम (P. Subbarayan) – 1938 ते 1946
- अँथनी एस डी मेलो (Anthony S. D’Mello) – 1946 ते 1951
- जे सी मुखर्जी (J.C. Mukherji) – 1951 ते 1954
- विजयनगरचे महाराजाकुमार (Maharajkumar of Vizianagram) – 1954 ते 1956
- सरदार सुरजित सिंग मजिठिया (Sardar Surjit Singh Majithia) – 1956 ते 1958
- आर के पटेल (R.K. Patel) – 1958 ते 1960
- एम ए चिदंबरम (M.A. Chidambaram) – 1960 ते 1963
- महाराजा फतेहसिंग गायकवाड (Maharaja Fatehsinghrao Gaekwad) – 1963 ते 1966
- झेड आर इरानी (Z.R. Irani) – 1966 ते 1969
- ए एन घोष (A.N. Ghose) – 1969 ते 1972
- पी एम रनतुंगा (P.M. Rungta) – 1972 ते 1975
- रामप्रकाश मेहरा (Ramprakash Mehra) – 1975 ते 1977
- एम चिन्नास्वामी (M. Chinnaswamy) – 1977 ते 1980
- एस के वानखडे (S.K. Wankhede) – 1980 ते 1982
- एनकेपी साळवे (N.K.P. Salve) – 1982 ते 1985
- एस श्रीराम (S. Sriraman) – 1985 ते 1988
- बी एन दत्त (B.N. Dutt) – 1988 ते 1990
- माधवराव सिंधिया (Madhavrao Scindia) – 1990 ते 1993
- आयएस बिंद्रा (I.S. Bindra) – 1993 ते 1996
- राज सिंग डुंगरपूर (Raj Singh Dungarpur) – 1996 ते 1999
- ए सी मुथैया (A.C. Muthiah) – 1999 ते 2001
- जगमोहन दाल्मिया (Jagmohan Dalmiya) – 2001 ते 2004
- रनबीर सिंग महेंद्रा (Ranbir Singh Mahendra) – 2004 ते 2005
- शरद पवार (Sharad Pawar) – 2005 ते 2008
- शशांक मनोहर (Shashank Manohar) – 2008 ते 2011
- एन श्रीनिवासर (N. Srinivasan) – 2011 ते 2013
- जगमोहन दाल्मिया (Jagmohan Dalmiya) – 2013 प्रभारी अध्यक्ष
- एन श्रीनिवासन (N. Srinivasan) – 2013 ते 2014
- शिवलाल यादव (Shivlal Yadav) – 2014- प्रभारी अध्यक्ष
- सुनील गावसकर (Sunil Gavaskar) – 2014 प्रभारी अध्यक्ष
- जगमोहन दाल्मिया (Jagmohan Dalmiya) -2015
- शशांक मनोहर (Shashank Manohar) – 2015 ते 2016
- अनुराग ठाकुर (Anurag Thakur) – 2016 ते 2017
- सी के खन्ना (C.K. Khanna) – 2017 ते 2019
- सौरव गांगुली (Sourav Ganguly) – 2019 ते 2022
- रॉजर बिन्नी (Roger Binny) – 2022 मध्ये अद्यक्षपदी नियुक्ती
दरम्यान, रॉजर बिन्नी भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग राहिले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळताना बिन्नी आणि संघातील इतर खेळाडूंनी 1983 साली भारताला पहिला आयसीसी विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांनी या विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या होत्या. भारतासाठी बिन्नी एकूण 27 कसोटी सामने खेळले आणि यामध्ये 47 विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 830 धावांचीही नोंद आहे. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये बिन्नींनी 72 सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतल्या आणि 629 धावाही केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकापूर्वी बीसीसीआयच्या ‘त्या’ एका निर्णयाने पाकिस्तानला झटका, कोटींचा बसणार फटका!
बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय! अखेर महिला आयपीएलला मिळाली मान्यता; असा असू शकतो फॉरमॅट