अबु धाबीमध्ये रविवारी (८ नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला १७ धावांनी नमवले आणि दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे आता १० नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना रंगणार आहे.
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्यातील आकडेवारी
दिल्ली-हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १८९ धावा केल्या. यात शिखर धवनच्या ५० चेंडूत केलल्या सर्वाधिक ७८ धावांचा समावेश होता. तर शिमरॉन हेटमायरनेही २२ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी केली होती. हैदराबादकडून गोलंदाजी करताना संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तर दिल्लीच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाकडून केन विलियम्सनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४५ चेंडूत ६७ धावा केल्या. सोबतच अब्दुल समदनेही ३३ धावांचे योगदान दिले. त्यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाज जास्त धावा करु शकले नाहीत. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर मार्कस स्टोइनिसने ३ विकेट्सची कामगिरी केली.
अंतिम सामना गाठण्याची पहिली वेळ
आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात डोकावून पाहिले तर, दिल्लीने अंतिम सामन्यात धडक मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापुर्वीच्या एकाही हंगामात या संघांच्या वाट्याला उपविजेता बनण्याचेही सौभाग्य आलेले नाही. त्यामुळे हा दिल्लीसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई संघाची अंतिम सामन्यात मजल मारण्याची ही सहावी वेळ आहे.
आतापर्यंत झालेले आयपीएलचे अंतिम सामने
गतवर्षी म्हणजेच २०१९ साली मुंबई विरुद्ध चेन्नई संघात अंतिम सामना झाला होता. या सामन्यात मुंबईने विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावली होती. शिवाय २०१८मध्ये चेन्नई विरुद्ध हैदराबाद, २०१७मध्ये पुणे विरुद्ध मुंबई, २०१६मध्ये बेंगलोर विरुद्ध हैदराबाद, २०१५मध्ये मुंबई विरुद्ध चेन्नई, २०१४मध्ये कोलकाता विरुद्ध पंजाब हे संघ अंतिम सामन्यात आमने सामने आले होते.
तर २०१३मध्ये चेन्नई विरुद्ध मुंबई, २०१२मध्ये कोलकाता विरुद्ध चेन्नई, २०११मध्ये चेन्नई विरुद्ध बेंगलोर, २०१०मध्ये मुंबई विरुद्ध चेन्नई, २००९मध्ये डेक्कन विरुद्ध बेंगलोर, २००८मध्ये राजस्थान विरुद्ध चेन्नई यांच्यात ट्रॉफी पटकावण्यासाठी अंतिम लढाई झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमवीर शिखर धवनच्या पारड्यात नव्या ‘रेकॉर्डची’ भर; रोहित-डिविलियर्सलाही टाकले मागे
व्वा रे गब्बर! हैदराबादच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत धवनकडून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ