सोमवारी (दि. 29 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. हा सामना चेन्नईने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने जिंकला आणि पाचव्यांदा किताब आपल्या नावावर केला. दरवर्षीप्रमाणे आयपीएल 2023 हंगामातही अनेक युवा खेळाडू चमकले. जसे की, यशस्वी जयसवाल आणि रिंकू सिंग यांनी कमाल प्रदर्शन केले. तसेच, हंगामात काही असेही खेळाडू होते, ज्यांच्यावर मिनी लिलावात फ्रँचायझींनी कोट्यवधी रुपयांची उधळण केली, पण त्यांनी संघाला खराब प्रदर्शनाने निराश केले. चला तर आयपीएल 2023मधील फ्लॉप ठरलेल्या 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.
आयपीएल 2023मध्ये फ्लॉप ठरलेले 5 स्टार खेळाडू
1. सॅम करन
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात फ्लॉप ठरलेल्या स्टार खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी इंग्लंडचा सॅम करन (Sam Curran) याचे नाव येते. त्याने पंजाब किंग्स संघासाठी खास कामगिरी करता आली नाही. त्याने एकूण 14 सामने खेळताना 13 डावात 276 धावा केल्या. यामध्ये 1 अर्धशतकाचाही समावेश होता. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना 14 सामन्यात फक्त 10 विकेट्स घेतल्या. 31 धावा खर्च करून 3 विकेट्स ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी होती. विशेष म्हणजे, पंजाबने त्याला आयपीएल 2023च्या मिनी लिलावात 18.50 कोटी रुपयात संघात सामील केले होते.
2. बेन स्टोक्स
यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडचाच स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याचे नाव आहे. स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 हंगामात 16.25 कोटी रुपयात खरेदी केले होते. मात्र, तो लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने हंगामात फक्त 2 सामने खेळताना 15 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या अंगठ्यालाही दुखापत झाली, ज्यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले होते.
3. हॅरी ब्रूक
इंग्लंडचा तिसरा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) याच्यावरही सनरायझर्स हैदराबाद संघाने मिनी लिलावात 13.25 कोटींची उधळण केली होती. मात्र, त्यानेही संघाला निराशच केले. ब्रूकने 11 सामन्यात खेळताना 21.11च्या सरासरीने 190 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतकही झळकावले. मात्र, त्यानंतर त्याची बॅट संपूर्ण हंगामात शांतच राहिली.
4. रायली रुसो
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज रायली रुसो (Rilee Russouw) हा आयपीएल 2023मध्ये फ्लॉप राहिला. त्याने हंगामात 9 सामने खेळताना 29.86च्या सरासरीने फक्त 209 धावा केल्या. या धावा करताना त्याने फक्त 1 अर्धशतक मारले. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने या हंगामासाठी 4.60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, तो हंगामात आपली छाप सोडू शकला नाही. (list of flop players in ipl 2023 who were otherwise considered as star players know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final साठी गेलेल्या भारतीय खेळाडूंनी लंडनमधून अनुभवला IPL फायनलचा थरार, फोटो पाहिले का?
‘अखेरच्या षटकात मी स्वत:ला…’, विजयी शॉट मारल्यानंतर भावूक झाला जडेजा; धोनीबाबत मन जिंकणारे वक्तव्य