---Advertisement---

आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतताना संघर्ष करावा लागणाऱ्या परदेशी खेळाडूंची संपूर्ण यादी

On: बुधवार, मे 5, 2021 2:30 AM
---Advertisement---

अखेर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळेच बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर विदेशातील खेळाडू आपापल्या मायदेशात परतण्याच्या तयारीत आहेत, मात्र अनेक देशांनी भारतात प्रवास करून आलेल्या व्यक्तींसाठी काही कठोर नियम केले आहेत व त्यामुळे या खेळाडूंना देखील आपापल्या मायभूमीत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

असे असले तरी आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी परदेशी खेळाडूंना दिलासा देणारे भाष्य आयपीएल स्थगित झाल्यानंतर केले होते. त्यांनी म्हटले होते की परदेशी खेळाडूंना परत पाठवण्यासाठी आम्ही मार्ग शोधू.

आपल्या मायभूमीत जाण्यासाठी सर्वात जास्त संघर्ष ऑस्ट्रेलिया, बांगलादेश व इंग्लंड मधील खेळाडूंना करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 15 मेपर्यंत सीमीबंदी घातलेली असून; ब्रिटन व बांगलादेश यांनीदेखील कोरोनाच्या नियमांमध्ये आणखीनच कठोरता आणली आहे.

इंग्लंड मधील खेळाडूंना इंग्लंडमध्ये परतल्यानंतर हॉटलच्या खोलीतच 10 दिवस क्वारंटाइन रहावे लागणार आहे. तसेच यादरम्यान २ वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तर बांगलादेशमध्ये विमान प्रवास बंद केलेला असून व्हाया रोडने येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाइन रहावे लागणार आहे. पुढील यादीत संघ निहाय खेळाडूंची नावे आहेत ज्यांना आपल्या मायदेशात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज –
मोईन अली, सॅम करन – इंग्लंड
जेसन बेऱ्हेंडॉर्फ – ऑस्ट्रेलिया

दिल्ली कॅपिटल –
स्टिव स्मिथ, मार्कस स्टॉयनीस – ऑस्ट्रेलिया
सॅम बिलिंग्स , टॉम करन, ख्रिस मॉरिस – इंग्लंड

कोलकता नाईट रायडर्स –
ओएन मॉर्गन – इंग्लंड
पॅट कमिन्स, बेन कटिंग- ऑस्ट्रेलिया
शाकीब अल हसन – बांगलादेश

मुंबई इंडियन्स –
ख्रिस लीन, नॅथन-कुल्टर नाईल – ऑस्ट्रेलिया

पंजाब किंग्ज –
ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान – इंग्लंड
रायली मेरिडीथ, मोजेस हेन्रीक्स, जाय रिचर्डसन – ऑस्ट्रेलिया

राजस्थान रॉयल्स –
जॉस बटलर – इंग्लंड
मुस्तफिझुर रेहमान- बांगलादेश

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर –
ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, डॅनियल ख्रिश्चन – ऑस्ट्रेलिया

महत्त्वाच्या बातम्या –

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला मृत्यूचा उल्लेख, अश्विनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

एकच नंबर! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने घेतलेला एकहाती नेत्रदीपक झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ

डॅडी तुम्ही थेट घरी या! डेव्हिड वॉर्नरच्या लाडक्या लेकीने वडीलांसाठी लिहिले भावनिक पत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---