ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगचा (बीबीएल) अंतिम सामना पर्थ स्कॉर्चर्स व सिडनी सिक्सर्स यांच्या दरम्यान सिडनी येथे खेळला जातोय. सिडनीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १८८ धावा करत पर्थ स्कॉर्चर्सला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यादरम्यान पर्थचा सलामीवीर लियम लिव्हींगस्टोन याने चाहत्यांनी उडवलेल्या खिल्लीची अप्रत्यक्षरीत्या कबुली दिली.
चाहत्यांनी उडवली होती खिल्ली
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज असलेला लियम लिव्हींगस्टोन पर्थ स्कॉर्चर्ससाठी सलामीवीर म्हणून भूमिका निभावतो. मागील दोन हंगामापासून तो संघाचा प्रमुख सदस्य बनला आहे. अंतिम सामना सुरू असताना काही प्रेक्षकांनी त्याला उद्देशून म्हटले, “तू उत्तम खेळाडू असता तर इथे नाही भारतात असता.”
सिडनी सिक्सर्सचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकात समालोचकाने लिव्हींगस्टोनला प्रेक्षकांनी म्हटलेल्या वाक्याची आठवण करून दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “हो मला वाटतं हे काही प्रमाणात खरं आहे.” सध्या इंग्लंडचा संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. या मालिकेसाठीच्या संघात लिव्हींगस्टोनचा समावेश नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांनी लिव्हींगस्टोनविषयी अशा प्रकारची वाक्य वापरली होती.
https://twitter.com/cricketcomau/status/1357983130632613888
चांगल्या फॉर्ममध्ये आहे लिव्हींगस्टोन
इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळलेला लिव्हींगस्टोन बीबीएलमध्ये पर्थ स्कॉर्चर्सचे प्रतिनिधित्व करतो. आपला इंग्लंडचा सहकारी जेसन रॉयसोबत मिळून त्याने पर्थला या हंगामात काही शानदार विजय मिळवून दिले. लिव्हींगस्टोनने चालू हंगामात आतापर्यंत १५ सामने खेळताना ३८१ धावा फटकावल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत या हंगामात २६ षटकार ठोकले आहेत. पर्थ स्कॉर्चर्सला या हंगामाचे विजेतेपद मिळवायचे असल्यास त्याला अंतिम सामन्यात मोठी खेळी करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन
भारताच्या संघव्यवस्थापनाची पहिल्या कसोटीसाठी हास्यास्पद संघनिवड, या दिग्गजाची टीका
सिराज-कुलदीपमध्ये झाली हमरातुमरी?, व्हिडिओ होतोय व्हायरल






