रविवारी (दि. 7) मुंबई विरुद्ध वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात दारूण पराभव पाहावा लागलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एक गुड न्यूज आहे. दिल्ली कॅपिटल्स संघात लवकरच एका घातक खेळाडूची एन्ट्री होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू हॅरी ब्रुक हा संघातून बाहेर गेल्याने त्याच्या जागेवर या खेळाडूला संधी मिळत आहे आणि तो लवकरच दिल्लीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ( Lizaad Williams Joins Delhi Capitals As Replacement For Harry Brook IPL 2024 )
प्राप्त माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू लिझाद विल्यम्स हा लवकरच दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. हॅरी ब्रुक आयपीएल 2024 मध्ये खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर लिझाद विल्यम्सची वर्णी लागली आहे. लिझाद विल्यम्स हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाकडून 2021 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी करत तर, उजव्या हाताने फलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 371 धावा चोपल्या आहेत. तर 16 बळी घेतले आहेत.
🚨 NEWS 🚨
Lizaad Williams joins @DelhiCapitals as a replacement for Harry Brook.
Read More 🔽 #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
🚨 Announcement 🚨
The 🇿🇦 speedster, Lizaad Williams is all set to ROAR for us this season 🙌
He comes into our squad as a replacement for 🏴’s Harry Brook ↩️
#YehHaiNayiDilli #IPL2024 pic.twitter.com/0HgHi67ZLQ— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 8, 2024
अधिक वाचा –
– जसप्रीत बुमराहचा किलर यॉर्कर! प्रयत्न करूनही पृथ्वी शॉ काहीच करू शकला नाही; पाहा VIDEO
– दिल्ली कॅपिटल्ससाठी आता प्लेऑफचा रस्ता कठीण, जाणून घ्या ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाची कारणं
– अक्षर पटेलचा अशक्यप्राय झेल! इशान किशनचा विश्वासच बसेना; पाहा VIDEO