---Advertisement---

स्टँडमध्ये गेलेला बॉल आणणार कोण? क्रिकेटपटूंसमोर मोठा प्रश्न

On: शुक्रवार, मार्च 13, 2020 1:41 PM
---Advertisement---

सिडनी। आजपासून(13 मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. ही मालिका कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या प्रेक्षकांच्या अनुपस्थिती खेळवली जात आहे. त्यामुळे स्टेडियमच्या स्टँडमध्ये गेलेला चेंडू खेळाडूंनाच जाऊन आणावा लागत आहे. नुकताच असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यात दिसते की आज ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड संघात सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन स्टँडमध्ये गेलेला चेंडू शोधत आहे.

झाले असे की ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असताना 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने षटकार ठोकला. त्यामुळे तो चेंडू थेट स्टँडमध्ये गेला होता. पण स्टँडमध्ये प्रेक्षक उपस्थित नसल्याने फर्ग्यूसनला स्टँडमध्ये जाऊन चेंडू आणावा लागला. याचा व्हिडिओ cricket.com.au ने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 

सध्या कोरोना व्हायरस झपाट्याने जगभरात पसरत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्रीडा स्पर्धांवर होत आहे. क्रीडा क्षेत्रात आत्तापर्यंत फुटबॉलमधील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण?

 संपुर्ण यादी- रणजी ट्राॅफी स्पर्धेचे आजपर्यंतचे सर्व विजेते आणि उपविजेते

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून निवडलेल्या संभाव्य पुरुष खेळाडूंच्या यादीत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंची वर्णी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---