दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ‘न भुतो ना भविष्यती’ अशी परिस्थिती पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात विरुद्ध संघाच्या दांड्या गुल करून सामन्यावर वर्चस्व मिळवलेला भारतीय संघ एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अवघ्या 9 मिनिटे आणि 8 चेंडूत 6 विकेट्स गमावत भारतीय संघ 153 धावांवर सर्वबाद झाला. एकेवेळी सामन्यावर मजबूत पकड घेण्याच्या अवस्थेत असलेला भारतीय संघ कसोटीतील सर्वात लाजीरवाणा पराक्रम स्वतःच्या नावावर करून बसलाय. नेमकं काय घडलं या सामन्यात ते आपण विस्तारात पाहूयात.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर गुंडाळत पहिल्याच सत्रात भारतीय संघाने सामना आपल्या बाजूने खेचला. त्याला लगेचच जोड मिळाली ती भारतीय फलंदाजीच्या पहिल्या तुकडीची. भारताचा सलामीवर तथा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गील यांनी उत्तम फलंदाजी करत भारताला दुसऱ्या सत्रात आघाडीवर नेले. परंतू रोहित शर्मा-शुभमन गील आणि विराट कोहली – केएल राहुल यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला मैदानावर टिकता आले नाही की भागिदारी करता आली नाही. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना गिअर बदलत टीम इंडियाला दिवसा चांदणे दाखवायला सुरुवात केली.
केएल राहुल बाद झाला तेव्हा भारतीय संघाची अवस्था 153 धावांवर 4 बाद अशी होती. त्यानंतर मात्र भारताचा आलेला प्रत्येक खेळाडू फक्त हजेरी लावून गेला अशा पद्धतीत बाद होत राहिला. 153-4 वरून भारतीय संघ पुढील 8 चेंडूत आणि 9 मिनिटात 153 धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान, भारताची अशीच अवस्थात 2014 मध्येही झाली होती. त्यावेळी भारतासमोर इंग्लंडचे आव्हान होते.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 6 फलंदाज शुन्यावर बाद होण्याची ही आठवी वेळ आहे, ही नकोशी कामगिरी बुधवारी भारताने केली. ही नकोशी कामगिरा करणारा पहिला संघ पाकिस्तान होती. 1980 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात पाकिस्तानचे सहा फलंदाज शुन्यावर बाद झाले होते. त्यानंतर 1996 मध्ये श्रीलंका, 2002 मध्ये बांगलादेश, 2014 मध्ये भारत, 2018 मध्ये न्यूझीलंड, आणि 2022 मध्ये बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांमध्ये अशी निराशाजनक खेळी केली होती. त्यानंतर थेट 2024 च्या पहिल्याच आठवड्यात भारताच्या नावावर हा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. (Losing six wickets on a duck in an innings has given India an unwelcome record)
महत्वाच्या बातम्या –
वाईट! शेवटची 14 मिनिटे आणि 12 चेंडूमध्ये टीम इंडियाच्या बत्त्या गुल, संघ ऑलआऊट
SA vs IND । यान्सेनच्या विकेटचं श्रेय सिराजइतकंच विराटला! माजी कर्णधाराचा अनुभव आला कामी, पाहा व्हिडिओ