कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता संपूर्ण क्रीडाक्षेत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्व पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच महिला क्रिकेटपटूही आपापल्या घरात वेळ घालवत आहेत.
अशामध्ये आता हे खेळाडू मोकळ्या वेळात आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांशी प्रश्नोत्तरांमार्फत चर्चा करत आहेत.
यावेळी भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्म्रीती मंधानानेही (Smriti Mandhana) चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यादरम्यान एका चाहत्याने स्म्रीतीला प्रश्न विचारला की, “तु लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज (Love or Arrange Marriage)?”
यावेळी स्म्रीतीने मजेशीर उत्तर दिले. स्म्रीतीने लिहिले की, “मला लव्ह-रेंज लग्न करायला आवडेल.” स्म्रीतीच्या या उत्तराने चाहत्यांना विचार करण्यास भाग पाडले, की नेमकं स्म्रीतीला लव्ह मॅरेज करायचं आहे की, अरेंज मॅरेज?
I prefer Love-ranged😝 https://t.co/mTjTFM14AN
— Smriti Mandhana (@mandhana_smriti) April 3, 2020
याव्यतिरिक्त दुसऱ्या एका चाहत्याने विचारले की, तुझा लाईफ पार्टनर बनण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असायला हवे? यावेळी तीने चाहत्याला दोन अटी ठेवल्या. स्म्रीतीने यावेळी उत्तर देत ट्वीट केले की, “पहिला अट अशी की तो व्यक्ती खूप प्रेम करणारा असला पाहिजे. दुसरी अट अशी की तो व्यक्ती पहिली अट मानणारा असला पाहिजे.”
Number 1-He should love me
Number 2-He should follow criteria number one 👆🏼😜 https://t.co/OCRKESUqif— Smriti Mandhana (@mandhana_smriti) April 3, 2020
स्म्रीती २०१७साली आयसीसी महिला वनडे विश्वचषकादरम्यान खूप चर्चेत होती. इतकेच नव्हे तर तिच्या खेळाची आणि सौंदर्याची खूप प्रशंसाही केली होती. सध्या स्म्रीती भारतीय संघाची उत्कृष्ट फलंदाज आहे.
आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२०मध्ये स्म्रीतीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान स्म्रीती फॉर्ममध्ये नव्हती. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) ८५ धावांनी भारतीय संघाला पराभूत केले होते. तसेच आयसीसी विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हे ५ आयपीएल विक्रम मोडणं जवळपास अशक्यच
-आयसीसीने निवडली स्टे होम ११, दोन भारतीय खेळाडूंना दिली संधी
-ऑगस्ट महिन्यात भारतात क्रिकेट सामने खेळायला हा देश झाला तयार