कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दहा विकेट्स घेणारा अनिल कुंबळे भारताचा पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू आहे. मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून गुढघे टेकण्यास भाग पडणारा भारताच्या हया सर्वोत्तम गोलंदाजाने एका महिलेच्या प्रेमापुढे आपले पाय देखील सहज टेकले होते.
कुंबळेच्या क्रिकेटच्या कारकिर्दीप्रमाणे त्याचे खाजगी जीवनसुद्धा खूपच रोमांचक राहिले. भारतीय संघामध्ये ‘जम्बो’ नावाने प्रसिद्ध असणारा अनिल कुंबळे हा एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला होता.
अनिल कुंबळे जेव्हा प्रेमात पडला तेव्हा तो एक यशस्वी आणि नावाजलेला क्रिकेटपटू होता. त्यावेळी त्याची ओळख झाली चेतना नामक एका महिलेशी. त्यावेळी चेतना आपल्या पारिवारिक संघर्षात झगडत होती, लढत होती.
अशी झाली दोघांची भेट
चेतनाचे पती एक यशस्वी व्यापारी होते. परंतु ती आपल्या या वैवाहिक आयुष्यात फारशी सुखी नव्हती. त्यावेळी आपले घर सोडून एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ती काम करत होती आणि याच ठिकाणी तिची आणि अनिल कुंबळे याची भेट झाली होती. अनिलला चेतना खूप आवडायची परंतु चेतनाचा प्रेम आणि नातेसंबंध यांच्यावर काडीमात्र विश्वास नसल्याने दुसरा प्रेमाचा ती विचारदेखील करत नव्हती. परंतु याच दरम्यान या दोघात गाठीभेटी अधिक होऊ लागल्या आणि या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. या सर्व कालखंडात अनिल कुंबळेला तिला मनाविण्यास देखील फार वेळ लागला होता.
मुलीचा स्वीकार
चेतना हीचा पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर तिने १ जुलै १९९९ मध्ये अनिलसोबत विवाह केला. एका मुलीच्या आईशी लग्न करणे हे कुंबळे याच्यासाठी काही सोपी गोष्ट नव्हती. कारण त्यासाठी त्याला अनेक कायदेशीर बाबीतून जावे लागणार होते. पहिल्या पतीपासून चेतनाला आरूणी नावाची मुलगी होती, तिचा देखील कुंबळे यांनी स्वीकार करावा लागणार होता. त्यामुळे आरूणीची कस्टडी या दोघांना कोर्टात अनेक वर्षे खटला लढल्यानंतर मिळाली होती. आरूणीनंतर अनिल कुंबळे याला एक मुलगा आणि एक मुलगी झाल ज्याचं नाव मायस आणि स्वाती आहे आणि आजही कुंबळे आपल्या तिन्ही मुलांना एकसमान मानतात.
कुंबळेची कारकिर्द –
अनिल कुंबळेने आपल्या गोलंदाजी कसोटी क्रिकेट कारकिर्दीत १३२ सामने खेळले असून ६१९ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. याशिवाय एकदिवसीय सामन्यात २७१ सामन्यात एकूण ३७३ विकेट्स हस्तगत करण्यास तो यशस्वी ठरला. याखेरीज त्यानी एकूण ४२ आयपीएल सामने खेळले असून त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावाची उस्तुकता शिगेला! चेन्नई संघ ‘या’ ५ खेळाडूंवर लावू शकतो मोठी बोली
रहाणे बाद असतानाही ठरला नाबाद! तिसऱ्या पंचांच्या हलगर्जीपणावर वैतागला जो रूट
भारतात रोहितचंच राज्य! ठरला ‘हा’ विक्रम करणारा तिसरा वेगवान फलंदाज