भारतीय क्रिकेट संघाचा माजी विस्फोेटक फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत दमदार कामगिरी करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सेहवाग त्याच्या फटकेबाजीने चाहत्यांच्या मनावर राज करत असायचा. मात्र, जेवढ्या वेगाने सेहवाग मैदानावर धावा करत असायचा, तेवढ्या वेगाने त्याची प्रेम कहाणी पूर्ण करण्यात त्याला यश आले नाही. पण, पराभूत होणे हे सेहवागच्या रक्तात नव्हते. शेवटी त्याने त्याच्या प्रेम कहाणीचा हॅपी एन्ड (आंनदी शेवट) केलाच.
तर जाणून घेऊया, सेहवागच्या चित्रपटापेक्षा कमी नसलेल्या प्रेम कहाणीविषयी Love Story Of Aarti Ahlawat And Virender Sehwag.
आरती अहलावत, हे सेहवागच्या प्रेमिकेचे नाव होते. आरती आणि सेहवाग पहिल्यांदा एकमेकांना भेटले तेव्हा सेहवाग फक्त ७ वर्षांचा तर आरती फक्त ५ वर्षांची होती. ती वेळ होती १९८० सालची. तेव्हा सेहवाग त्याच्या चुलत भावाच्या लग्नाला गेला होता आणि आरतीची काकू ही सेहवागच्या चुलत भावाची बायको होती. त्यावेळी लहान असणाऱ्या सेहवाग आणि आरतीने सोबत खूप मस्ती केली आणि तिथेच त्यांची मैत्री झाली. पुढे, १४ वर्षांच्या मैत्रीनंतर अखेर सेहवागने त्यांच्या मैत्रीला प्रेमात बदलायचे ठरवले.
२१ वर्षांचा असताना सेहवागने आरतीला प्रपोज केले होते. सेहवागचे मस्तीमध्ये आरतीला प्रपोज केले होते, पण तिने ते खरे असल्याचे समजून त्याला होकार दिला होता. पुढे ३ वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केले. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. परंतु, त्यांना त्यांच्या प्रेमाला नात्याचे रुप द्यायचे होते. मात्र, दोघांचे कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. कित्येकदा तरी लग्नाला नकार देणाऱ्या कुटुंबांना शेवटी त्यांच्या प्रेमापुढे हार मानावी लागली आणि २००४मध्ये दिल्लीमध्ये हरियाणा पद्धतीने त्यांचे लग्न झाले.
अशा प्रकारे, सेहवागची लहानपणीपासूनची मैत्रीण पुढे प्रेयसी बनली आणि तिच प्रेयसी शेवटी त्याची पत्नी बनली.
लग्नानंतर एका मुलाखतीत सेहवागने सांगितले होते की, “आमच्याकडे नात्यातील कुटुंबामध्ये लग्न केली जात नाहीत. या कारणामुळेच माझे आई-वडील आमच्या लग्नावर आनंदी नव्हते. थोडा वेळ लागला. पण, शेवटी ते आमच्या लग्नासाठी तयार झाले. दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी तयार करणे खुप अवघड होते. परंतु, मी आनंदी आहे की मी ज्या मुलीवर प्रेम केले होते, तीच आज माझी जीवनसाथी आहे.”
या मुलाखतीत बोलताना आरतीही म्हणाली होती की, “लग्नाच्या वेळी आमच्या नातेसंबंधातील खूप व्यक्ति नाराज होत्या. एवढेच नाही तर आमचे परिवारही नाखूश दिसत होते.” आता आरती आणि सेहवाग हे २ मुलांचे आई-वडील आहेत आणि ते दोघेही त्यांच्या जिवनात खुप आनंदी आहेत.