---Advertisement---

मोठी बातमी! भारताच्या पारड्यात अजून एका पदकाची भर, बॉक्सर लवलीनाने जिंकलं ‘ब्राँझ’ मेडल

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 11:34 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारतासाठी चांगला ठरताना दिसत आहे. भालाफेकीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात उत्तम कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. तसेच बॉक्सिंगमध्ये रवी कुमार दहिया आणि दीपिक पुनिया यांनी उपांत्य सामन्याचे तिकीट मिळवले आहे. यानंतर आता बॉक्सिंगमधून वाईट बातमी येत आहे. भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनला उपांत्य सामन्यात जागतिक चॅम्पियन बॉक्सरकडून पराभव स्वीकारावा लागला.असे असले, तरीही पहिल्याच ऑलिंपिकमध्ये लवलीनाने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

महिला बॉक्सिंगमध्ये ६९ किलो वजनी गटातील उपांत्य सामना भारताची लवलीना बोरगोहेन आणि तुर्कीची जागतिक अव्वल मानांकित बॉक्सर बुसेनाझ यांच्यात पार पडला. हा सामना बुसेनाझने ०-५ ने जिंकला.

या सामन्यात पहिल्या राऊंडमध्ये लवलीनाने दमदार प्रदर्शन केले. मात्र, परीक्षकांनी सर्व संमतीने बुसेनाझच्या प्रदर्शनाला प्रभावी करार देत ५-० ने निर्णय दिला. यात बुसेनाझला १०, तर लवलीनाला ९ गुण दिले. त्यामुळे लवलीनाला ०-५ ने पराभूत व्हावे लागले. (Indian boxer Lovlina Borgohain (69kg) signs off with bronze medal in Olympics after 5-0 loss to Turkey’s Busenaz Surmeneli in semifinals)

यानंतर दुसऱ्या राऊंडमध्येही बुसेनाझ लवलीनावर वर्चस्व गाजवताना दिसली. यामध्ये बुसेनाझला पहिल्या राऊंडप्रमाणेच १०, तर लवलीनाला ९ गुण दिले.

या सामन्यात पराभूत होऊनही, लवलीनाला कांस्य पदक मिळणे निश्चित आहे. कारण बॉक्सिंगच्या उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या दोन्ही बॉक्सरला कांस्य पदक दिले जाते.

विशेष म्हणजे टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील हे भारताचे तिसरे पदक असेल. कारण, यापूर्वी सुरुवातीलाच वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूने रौप्य पदक आणि बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने कांस्य पदकाची कमाई करत भारताला २ ऑलिंपिक पदके मिळवून दिली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी

-बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक

-लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---