वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आयपीएल २०२० स्पर्धेत सपशेल फ्लॉप ठरला होता. त्याने आपल्या कामगिरीने चाहत्यांना निराश केले होते. परंतु लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात खेळताना त्याने तूफानी खेळी केली. शनिवारी (२८ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात रसेलने फक्त 14 चेंडूत अर्धशतक ठोकले. टी-20 मध्ये ठोकलेले सर्वात वेगवान अर्धशतकाचा हा विक्रम आहे. हा विक्रम त्याने कोलंबो किंग्ज संघाकडून खेळताना गाले ग्लेडिएटर्स संघाविरुद्ध केला.
पावसामुळे हा सामना 20 षटकांऐवजी कमी करून 5-5 षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या कोलंबो किंग्ज संघाकडून खेळताना रसेलने सलामीला येत आक्रमक खेळी केली. त्याने फक्त 19 चेंडूत 65 धावांची खेळी करत संघाला 96 धावांवर पोहचवले. ग्लेडिएटर्स संघाने धावांचा पाठलाग करताना 2 गडी गमावून फक्त 62 धावा
केल्या. त्यांच्याकडून धनुष्का गुणतिलकाने 15 चेंडूत 30 धावा केल्या.
आंद्रे रसेलची दमदार खेळी
लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो संघाच्या डावाची सुरुवात करताना आंद्रे रसेलने दमदार खेळी साकारली. त्याने 19 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी करताना 9 चौकार अणि 4 षटकार लगावले. 19 चेंडूचा सामना करताना रसेलने फक्त 2 चेंडू निर्धाव जाऊ दिले. 3 एकेरी धावा घेतल्या आणि एका चेंडूवर 2 धावा केल्या. ही टी-20 मध्ये केलेले सर्वात वेगवान पाचवे अर्धशतक ठरले. 14 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा बाबतीत आयपीएल मधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे सुद्धा नाव समाविष्ट आहे.
सर्वात वेगवान टी-20 अर्धशतके
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या नावावर सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आहे. 2007 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध फक्त 12 चेंडूत त्याने अर्धशतक ठोकले होते. त्यानंतर ख्रिस गेलने 2016 साली बिग बॅश लीगमध्ये 12 चेंडूत अर्धशतक केले होते. याशिवाय हजरतुल्ला झझाइ यांच्या नावावर सुद्धा 12 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम आहे.
रसेलने आयपीएल २०२० मध्ये १० सामने खेळताना केवळ ११७ धावा केल्या होत्या, तर गोलंदाजी करताना त्याने केवळ ६ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला
वनडेत सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा करणारे संघ, भारताच्या नावे ‘हा’ विक्रम