क्रिकेटचा कोणताही प्रकार असो त्यामध्ये नेहमीच खेळाडूंमध्ये काही ना काही वाद पाहायलाच मिळतात. अशामध्येच नुकतेच श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीग २०२० मध्ये अनेक देशांच्या क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला आहे. या लीगमधील कँडी टस्कर्स आणि गाले ग्लेडिएटर्स यांच्यातील सामन्यात मोहम्मद आमिर आणि नवीन उल हकमध्ये वाद झाला होता. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी चांगलाच तापलेला दिसला.
आफ्रिदीने नवीन उल हकला याप्रकरणाबद्दल विचारले असता तो त्याच्याशीही उद्धटपणे बोलताना दिसला. यानंतर आफ्रिदीने त्याचा चांगलाच समाचार घेतला.
मोहम्मद आमिर हा एलपीएल स्पर्धेत गाले ग्लेडिएटर्स संघाकडून, तर नवीन कँडी टस्कर्स संघाकडून खेळत आहे. यासोबतच आफ्रिदीही ग्लेडिएटर्स संघाचा भाग आहे. सामन्यादरम्यान नवीनने आमिरबद्दल अपशब्द वापरले. यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु नवीन थांबला नाही आणि त्याने आपली चर्चा पुढे चालूच ठेवली. यानंतर आफ्रिदीने मध्यस्थी केली.
https://www.instagram.com/tv/CIOxwpen6bL/?utm_source=ig_web_copy_link
सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हात मिळवत होते. त्यावेळी आफ्रिदीने नवीनला रागात विचारले, काय झालंय? यावर नवीननेही रागातच उत्तर दिले. त्यानंतर आफ्रिदीने प्रत्युत्तर देत म्हटले, “बेटा, तुझा जन्म होण्यापूर्वी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते.”
https://twitter.com/Saj_PakPassion/status/1333484091036098561
आफ्रिदीने वयाच्या २० व्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. तो त्या वयात सर्वाधिक वनडे सामने खेळणारा खेळाडू बनला होता. त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतक ठोकले होते. दुसरीकडे नवीनचे वय आता २१ वर्ष आहे. अशामध्ये आफ्रिदीशी त्याने केलेले वर्तन कोणत्याही चाहत्याला पसंत पडले नाही.
सामन्यादरम्यान नवीन सतत आमिरला वाईट शब्दात बोलत होता. सर्वांनी विरोध करूनही तो शांत बसत नव्हता. भारतीय माजी खेळाडू मुनाफ पटेलनही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याने ते ऐकले नाही.
या सामन्यात कँडी टस्कर्सने २० षटकात ५ विकेट्स गमावत १९६ धावा केल्या. टस्कर्सकडून फलंदाजी करताना ब्रेंडन टेलरने ३५ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी केली. यामध्ये १ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. सोबतच कुसल मेंडिसने ४९ धावा ठोकल्या. ग्लेडिएटर्स संघाकडून गोलंदाजी करताना लक्षण संदाकनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना ग्लेडिएटर्स संघाला ७ विकेट्स गमावत केवळ १७१ धावाच करता आल्या. यावेळी ग्लेडिएटर्स संघाकडून धनुष्का गुणतिलकाने सर्वाधिक ८२ धावा केल्या, तर मोहम्मद आमिरने केवळ १५ धावा केल्या. टस्कर्स संघाकडून गोलंदाजी करताना नवीनने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
Video: स्मिथने भन्नाट डाइव्ह मारत घेतला अय्यरचा झेल; दाखवला तंबूचा रस्ता
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज






