दिल्ली कॅपिटल्सचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलला त्याच्या जुन्या फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी करण्याची संधी असेल. आयपीएल 2025च्या 40व्या सामन्यात 22 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना लखनT सुपर जायंट्सशी होईल. या सामन्यात केएल राहुलला आयपीएलमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी असेल. तो या बाबतीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकू शकतो.
आयपीएलमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करणारा फलंदाज होण्यापासून केएल राहुल फक्त 51 धावा दूर आहे. राहुलने आतापर्यंत 129 डावांमध्ये 4949 धावा केल्या आहेत. सध्या हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने 135 डावांमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या. या यादीत अनुभवी फलंदाज विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. त्याने 157 डावांमध्ये ही कामगिरी केली.
केएल राहुलने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्याने 6 सामन्यांच्या 6 डावात 53.20 च्या सरासरीने 266 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 158.33 राहिला आहे. या हंगामात त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. राहुल या हंगामात दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तो आगामी सामन्यांमध्येही हाच फॉर्म सुरू ठेवू इच्छितो. दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या 7 सामन्यांत 5 विजय आणि 10 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
KKR vs GT: हर्षा भोगले यांनी का टाळलं काॅमेंट्री? सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण