सोमवारी (२८ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे २ नवे संघ, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स त्यांच्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी आमने सामने आले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याने पहिल्याच चेंडूवर आपल्या कर्णधाराचा निर्णय खरा ठरवला. शमीने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार केएल राहुल याला भोपळाही न फोडता पव्हेलियनला धाडले.
गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडल्यामुळे लखनऊकडून राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजीसाठी आले होते. तर गुजरातकडून वेगवान गोलंदाज शमी (Mohammad Shami) पहिले षटक टाकत होता. त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर राहुलने फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटच्या आऊटसाईड एजला लागून यष्टीच्या मागे यष्टीरक्षक मार्क वूडच्या हातात घेतला. त्याने वेळ न दवडता राहुलचा अचूक झेल टिपला.
पहिल्याच चेंडूवर एकही धाव न घेता बाद झाल्यावर राहुलने त्वरित डीआरएससाठी अपील केली. परंतु पंचांनी रिव्ह्यूमध्ये तपासणी केल्यानंतरही तो बाद असल्याचेच आढळले. परिणामी राहुलला शून्यावर तंबूत परतावे (KL Rahul Golden Duck) लागले.
राहुल गुजरात टायटन्सविरुद्ध गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर बाद) झाल्यानंतर एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ २ संघांविरुद्ध गोल्डन डक झाला आणि ते दोन्ही संघ गुजरात हेच राहिले आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध बेंगलोर येथे झालेल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता.
How good was that first over from @MdShami11. Gets the big wicket of KL Rahul.
Live – https://t.co/4Kt4dkerZU #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/IDcZ4VIpgG
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
याखेरीज आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होणारा राहुल दुसराच कर्णधार बनला आहे. त्याच्यापूर्वी २००९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा त्यावेळचा कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम केविन पीटरसनच्या चेंडूवर गोल्डन डक झाला होता.
असे आहेत अंतिम ११ जणांचे संघ (GT vs LSG Playing XI) –
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार), क्विंटॉन डी कॉक (यष्टीरक्षक), एव्हिन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मोहसीन खान, आयुष बडोनी, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान
गुजरात टायटन्स – शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण ऍरॉन, मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या-
महान फिरकीपटूने इशान किशनला म्हटले ‘अद्भुत’ खेळाडू, जुना किस्सा सांगत उधळली स्तुतीसुमने
स्वत:च लावलेली पैज हारला हैदराबादचा वेगवान गोलंदाज; सरावादरम्यान यॉर्करही आला नाही टाकता