मुंबई| इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा सातवा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. उभय संघ हा सामना जिंकत हंगामातील विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील असतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ७.०० वाजता या सामन्यासाठी नाणेफेक झाली असून लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
लखनऊकडून मार्क वुडच्या जागी एँड्रयू टायला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. तो या सामन्यातून लखनऊ संघात पदार्पण करेल. लखनऊ संघात केवळ हा एकच बदल आहे. त्यांचा इतर संघ मागील सामन्याप्रमाणेच आहे. तर चेन्नईकडून प्रमुख अष्टपैली मोईन अली याचे पुनरागमन झाले आहे. तसेच २५ वर्षीय अनकॅप्ड भारतीय गोलंदाज मुकेश चौधरी याला चेन्नईकडून पदार्पणाची संधी दिली गेली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियस हा देखील नव्याने संघात सहभागी झाला आहे.
.@aj191 set for his @LucknowIPL debut. 👏 👏#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/QyUnaxEyxx
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
लखनऊ सुपरजायंट्सची प्लेइंग इलेव्हन-
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, दुष्मंथा चमीरा, एँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान
चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन-
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी, तुषार देशपांडे
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्समध्ये अखेर ‘सूर्योदय’! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी धडाकेबाज फलंदाज संघात सामील
किस्मत मेहरबान तो…! इंग्लंडच्या फलंदाजाला १-२ नव्हे चक्क ५ वेळा जीवनदान, सेमीफायनलमध्ये ठोकले शतक