इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावातील लक्षवेधी चेहऱ्यांपैकी एक राहिला, दक्षिण आफ्रिकेचा मातब्बर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक.
२ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या डी कॉकला विकत घेण्यासाठी लखनऊ सुपरजायंट्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर लखनऊ सुपर जायंट्स संघाने ६.७५ कोटींची बोली लावत डी कॉकला आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे.
डी कॉक यापूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा भाग राहिला आहे. त्याने गतवर्षी मुंबबईकडून ११ सामने खेळताना २९७ धावा केल्या होत्या. त्याच्या एकूण आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत ७७ सामने खेळताना २२५६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! विलियम्सनने चक्क डावा हात कापण्याचा केलेला विचार, वाचा नक्की काय झालं होतं
अष्टपैलू खेळाडू असावा तर ‘असा’ आयपीएल ऑक्शनपूर्वी, सलग ५ व्या सामन्यात पटकावला सामनावीर पुरस्कार