तामिळनाडू प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद लायका कोवाई किंग्जने जिंकले. अंतिम सामन्यात बुधवारी (12 जुलै) नेल्लई रॉयल किंग्जला लायका कोवाई किंग्जकडून 104 धावांचा पराभव स्वीकाराला लागला. लायका कवाई संघाने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात नेल्लई रॉयल किंग्जचा संपूर्ण संग 101 धावांवर गुंडाळला गेला. जातवेध सुब्रमण्यन याला सामनावीर पुरस्कार मिळाला.
एनपीएल 2023च्या अंतिम सामन्यात लायका कोवाई किंग्ज (Lyca Kovai Kings) आणि नेल्लई रॉयल किंग्ज (Nellai Royal Kings) संघ यांच्यात रोमांचक लढत होईल, असे वाटले होते. मात्र, सामना एखतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. जातवेध सुब्रमण्यम (Jhatavedh Subramanyan) याने लायका कोवाई किंग्जसाठी टाकलेल्या चार षटकांमध्ये 21धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तसेच शाहरुख खान याने 4 षटकात 16 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना प्रथम फलंदाजी करताना लायका संघासाठी बी सचिन (40 चेंडूत 51 धावा) आणि आतिक उर रहीम याने अवघ्या 21 चेंडूत 50 धावांची वादळी खेळी केली होती.
नेल्लई रॉयल किंग्जसाठी सोनू यादव आणि संदीप वारिअर यांनी दोन-दोन विकेट्स घेतल्या आहेत. पोहन प्रसाथ याने 1 विकेट घेतली. नेल्लई रॉयल किंग्जसाठी सलामीवीर अरुण कार्तिक याने सर्वाधिक 27 धावांची खेली केली. तर लक्ष्मण सूर्यप्रकाश याने 22 धावा केल्या आहेत. लायका कोवाई किंग्जचा कर्णधार शाहरुख खान याला पर्पल कॅप मिळाली. शाहरुखने टीएनपीएल 2023मध्ये सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या. नेल्लई रॉयल किंग्जचा वरच्या फळीतील फलंदाज गुरुस्वामी अजितेश याने अंतिम सामन्यात 1 धाव करून विकेट गमावली. मात्र हंगानात त्याचे प्रदर्शन जबरदस्त राहिले. त्याने टीएनपीएल 2023मध्ये 371 धावा केल्या आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. (Lyca Kovai Kings are the Champions of TNPL 2023!)
महत्वाच्या बातम्या –
जबडा तुटल्यानंतरही गोलंदाजी करणार म्हटल्यावर ‘अशी’ होती कुंबळेच्या पत्नीची रिऍक्शन, दिग्गजाने स्वतः केला खुलासा
‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’