---Advertisement---

ऑस्ट्रेलियन भूमीत टीम इंडियाविरुद्ध हा गोलंदाज ठरला सर्वात यशस्वी

---Advertisement---

पर्थ। भारताला आज(18 डिसेंबर) ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 146 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात त्यांचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने महत्त्वाची भूमीका बजावली. त्याने या सामन्यात 106 धावांत 8 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे.

त्याच्या या कामगिरीबरोबरच त्याने भारताविरुद्ध एक खास विक्रमही केला आहे. त्याने मायदेशात कसोटीमध्ये भारताविरुद्ध 9 सामन्यात 46 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. हा पराक्रम करताना त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीला मागे टाकले आहे.

ब्रेट लीने ऑस्ट्रेलियन भूमीत भारताविरुद्ध 8 कसोटी सामन्यात 45 विकेट्स घेतल्या आहेत. लीच्या पाठोपाठ या यादीत क्रेग मॅकडेरमोट असून त्यांनी 7 सामन्यात 34 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

46 विकेट्स – नॅथन लायन (9 सामने)

45 विकेट्स – ब्रेट ली (8 सामने)

34 विकेट्स –  क्रेग मॅकडेरमोट (7 सामने)

29 विकेट्स –  मिशेल जॉन्सन (7 सामने)

28 विकेट्स – वेन क्लार्क (5 सामने)

महत्तवाच्या बातम्या:

Video: कोहली-पेन सोडा पण टीम इंडियाचेच हे दोन खेळाडू भिडले मैदानावर…

कोहलीचा ‘तो’ निर्णय चूकला आणि टीम इंडियाने सामना गमावला…

भारताविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेसाठी १३ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

कोहली-पेन वाद हा खिलाडूवृत्तीला धरूनच – जोश हेजलवूड

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment