प्रो-कबड्डीच्या उत्तुंग यशामुळॆ कबड्डी भारतातील दुसऱ्य़ा क्रमांकाचा खेळ बनला आहे. त्यामुळेच स्थानिक खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी प्लम स्पोर्ट्स आणि दिगियाना स्पोर्ट्स यांनी संयुक्तरीत्या 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत मध्य प्रदेश कबड्डी लीगचे आयोजन केले आहे.
अभय प्रशाल स्टेडीयमवर पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्धाटन सभारंभाला संगीत दिग्दर्शक सलीम सुलेमान, अभिनेते शक्ती कपूर आणि गायक हार्डी संधू यांनी हजेरी लावली.
स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जी बी मोरे, रोहित कुमार चौधरी, रवी कुमार, महेश गौड, अमित सिंघ छिल्लर यांसारख्या प्रो-कबड्डी खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
अ गटात अव्वल असणाऱ्या महेश गौड आणि प्रीतम छिल्लर यांच्या ग्वालियर के महाराजाज संघाने इंदौरी योद्धासोबत त्यांचा पहिला सामना अवघ्या एका गुणाने (52-53) गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारत रेवांचल राजाज आणि खांडवा के खिलाडी (58-24) या संघांना एकतर्फी सामन्यात पराभूत करत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. रवी शर्माला त्या दोन्ही सामन्यात उत्कृष्ट बचावपटू म्हणून गौरवण्यात आले आहे.
नितीन मोरे या बचावपटूच्या खेळाच्या जोरावर इंदौरी योद्धाजने ग्वालियर के महाराजाज आणि खांडवाज के खिलाडी यांना पराभूत केल्यानंतर रेवांचल राजाजकडून (39-42) पराभव स्वीकारला. परंतु अ गटात ते दुसऱ्या स्थानी आहेत.
भवानी रजपूतच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भोपाळी नवाब गटात पहिल्या स्थानी राहिले. त्यांनी जबलपूर जाबाजचा (५४-३२) तर सागर सुलतानविरुद्ध त्यांनी विजय मिळवला तर उज्जेन धडकविरुद्ध त्यांना (३३-३४) अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.
शशांक वानखेडेने उज्जेन धडककडून खेळताना पहिल्या दोन सामन्यात संघाला विजय मिळवुन देण्यात मोलाचा वाटा उचलला.
या स्पर्धेचे आज उपांत्यफेरीचे सामने होणार आहेत. त्यात गाॅलियर के महाराजज विरुद्ध उज्जेन धडक यांच्यात संध्याकाळी ७ वाजता तर भोपाळी नवाब विरुद्ध इंदोरी योद्धाजमध्ये ८ वाजता हे दोन सामने रंगणार आहे. १२ आॅगस्ट रोजी उपांत्यफेरीच्या विजेत्या संघात अंतिम फेरीचा सामना रंगणार असून त्यानंतर समारोप समारंभ होणार आहे.
विजेत्या संघाला ११ लाख रुपये तर उपविजेत्या संघाला ५ लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे. बाॅलिवुड स्टार अंकित तिवारीचा शेवटच्या दिवशी गाण्याचा कार्यक्रम होणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश विनामुल्य असला तरी त्याचे पासेस हे बुक माय शो वेबसाईटवरुन मिळणार आहे.
सामन्याच थेट प्रक्षेपण निओ स्पोर्ट्सवर होणार आहे.
कबड्डी क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Kabaddi असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी
–विश्वचषकाच्या फायनलची खेळपट्टी बनवणाऱ्या ग्राउंड्समनचा निरोप सभारंभ हुकला