भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी२० मालिका नुकतीच संपली. आता सर्वांना कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. दरम्यान, भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अय्यर काही जादुई प्रयोग करुन दाखवत आहे.
या व्हिडिओमध्ये जादूगार श्रेयस अय्यरने मोहम्मद सिराजला पत्त्यांच्या जादूने थक्क करून सोडले, हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर मोहम्मद सिराजला या मजेदार जादूमध्ये सहभागी होण्यास सांगतो आणि ऋतुराज गायकवाड जवळ उभा राहून या शोचा आनंद घेत आहे.
बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या मजेशीर व्हिडिओमध्ये, अय्यर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला खिळवून ठेवत काही युक्त्या करताना दिसत आहे.
“श्रेयस अय्यर पत्यांची जादू दाखवतोय आणि सर्वांना स्तब्ध करतोय. श्रेयसची ही जादू पाहून सिराजही थक्क झाला,” असे बीसीसीआयने असे कॅप्शन देऊन हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.
Weaving some magic 🪄 with a deck of cards & blowing everyone's minds 😯
How's this card trick from @ShreyasIyer15 that got @mdsirajofficial stunned! 😎#TeamIndia #INDvNZ pic.twitter.com/kKLongQ0CJ
— BCCI (@BCCI) November 22, 2021
नुकत्याच संपलेल्या टी२० विश्वचषकातील निराशाजनक प्रदर्शनानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली, ज्यामध्ये आयपीएल स्टार वेंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध केले.
आता २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणार्या कसोटी मालिकेत भारतीय संघ आता खेळताना दिसेल. पहिला सामना कानपूरला झाल्यानंतर मुंबईत ३ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना होईल. दरम्यान, टी२० मालिकेसाठी आणि पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आलेला विराट कोहली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून पुनरागमन करेल.
त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल आणि पहिल्या कसोटीसाठी वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तानमध्ये होणार द्विपक्षीय मालिका? ‘या’ ठिकाणी होऊ शकते आयोजन
तमिळनाडूने तिसऱ्यांदा जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, पाहा आजपर्यंतचे विजेते