महाराजा टी20 ट्रॉफी 2024 च्या 21 व्या सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्सनं म्हैसूर वॉरियर्सचा 56 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ब्लास्टर्स संघानं 20 षटकांत 189/7 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, म्हैसूर वॉरियर्सचा संपूर्ण संघ 17.5 षटकांत केवळ 133 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे म्हैसूर वॉरियर्सला चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र अद्यापही संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. बंगळुरू ब्लास्टरच्या एलआर चेतनला (53 चेंडूत 88) सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरू ब्लास्टर्सची सुरुवात चांगली झाली नाही. संघानं पहिल्या चार षटकांतच आपले 2 गडी गमावले. यानंतर एलआर चेतननं शिवकुमार रक्षितच्या साथीनं धावसंख्या 100 पार नेली. शिवकुमारनं 28 चेंडूत 29 धावा केल्या. चेतननं उत्कृष्ट अर्धशतक केलं. तो शतक करेल असं वाटत होतं, मात्र तो वेगान धावा करण्याच्या नादात बाद झाला. त्यानं 53 चेंडूंत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 88 धावांची खेळी केली. सूरज आहुजानं 16 चेंडूत 32 धावा केल्या. कर्णधार शुभम हेगडे 11 धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे बेंगळुरू ब्लास्टर्सनं 7 गडी गमावून 189 धावा केल्या. म्हैसूर वॉरियर्सकडून अजित कार्तिकनं तीन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना म्हैसूर वॉरियर्सचे दोन्ही सलामीवीर 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तो केवळ 5 धावा करून तंबूत परतला. उत्कृष्ट फॉर्मात असलेला कर्णधार करुण नायरही 12 चेंडूत 13 धावा करून बाद झाला.
म्हैसूरची विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली आणि त्यांचे एकामागून एक फलंदाज बाद होत गेले. मनोज भांडगेला आपलं खातंही उघडता आलं नाही, तर कृष्णप्पा गौतमनं केवळ 3 धावा केल्या. अशाप्रकारे म्हैसूर वॉरियर्सचा संपूर्ण संघ 18व्या षटकात गारद झाला. बंगळुरू ब्लास्टर्सकडून शुभम हेगडे आणि क्रांती कुमार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
हेही वाचा –
ठरलं! आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्ज या 5 खेळाडूंना रिटेन करणार, शिखर धवनचं भविष्य काय?
संघ मालकांकडून होत असलेल्या चुकांवर केएल राहुलचं बेधडक वक्तव्य! म्हणाला, “प्रत्येक खेळाडू…”
अनेक गोलंदाजांचे आकडे तिसऱ्या क्रमांकावरील बाबर आझम पेक्षा चांगले, आईसीसी रँकिंगवर विश्वास तरी कसा ठेवायचा?