दरवर्षी चार दिवस होणारं ‘महाराष्ट्र केसरी’चं अधिवेशन दोन वजनी गटांची भर पडल्याने गेल्या वर्षीपासून पाच दिवसांचं झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षीही अधिवेशन पाच दिवसांचं असेल. आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे १० वजनीगटातल्या एकाहून एक सरस अशा मल्लांच्या लढती होतील. ‘महाराष्ट्र केसरी’च्या खुल्या गटासाठी 60 मल्ल आपली ताकद आजमावताना दिसतील.
१९ डिसेंबर – अधिवेशनाचा पहिला दिवस हा ५७ आणि ७९ वजनीगटाच्या मल्लांचा असेल. सकाळी ११ ते १२ वेळात या वजनीगटातल्या मल्लांची वजने आणि दुपारी ३ वा. नंतर कुस्त्या होतील.
२० डिसेंबर – दुस-या दिवशी ६१, ७० आणि ८६ किलो वजनीगटातल्या मल्लांची वजने आणि कुस्त्या तर होतीलच. शिवाय, ५७ आणि ७९ वजनीगटातल्या मल्लांच्या फायनलही होतील.
२१ डिसेंबर – तिसरा दिवस ७४, ९७ आणि ‘महाराष्ट्र केसरी’च्या खुल्या गटातल्या वजनांचा असेल. या दिवशीच त्यांच्या कुस्त्यांनाही सुरूवात होईल, शिवाय ६१, ७० आणि ८६ किलो वजनीगटातले सुवर्ण विजेतेही याच दिवशी मिळतील.
२२ डिसेंबर – चौथ्या दिवशी ६५ किलो आणि ९२ किलोच्या मल्लांची वजने आणि कुस्त्या होतील. खुल्या गटातल्या रंगतदार कुस्त्याही होतील. महत्त्वाचं म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेसाठीचे माती आणि मॅटवरचे भल्या भल्यांना नमवून आलेले दोन विजेते आपल्याला यादिवशी मिळतील.
२३ डिसेंबर – पाचवा आणि शेवटचा दिवस हा ६५, ९२ किलोच्या मल्लांचा.. विजयाचा.. उत्कठेंचा.. ‘महाराष्ट्र केसरी’ किताबवीराचा असेल आणि त्याच दिवशी महाराष्ट्राला २०१८चा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळेल..
महत्त्वाच्या बातम्या:
–महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व
–महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
–आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन
–७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं
–माझं धोनीबद्दलचं मत कधीच बदलणार नाही- गौतम गंभीर