महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी गादी विभागातून आणि माती विभागातून अंतिम फेरीनंतर दोन प्रतिस्पर्धी मल्लांची निवड झाली.
महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी आता कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात लढत होणार आहे. शनिवार (दि. ९ एप्रिल) रोजी सायंकाळी या दोन्ही मल्लात किताबासाठी अंतिम लढत होईल. ( Maharashtra Kesari 2022 Vishal Bunkar And Prithviraj Patil Will fight for Title )
तत्पुर्वी पृथ्वीराजने पुण्याच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजय मिळवत किताबी लढतीसाठी स्वतःच्या नावावर मोहोर उमटवली. तर, शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखवर १३-१९ अशा गुण फरकाने मात केली.
एकंदरीत मोठ्या स्पर्धेतून आणि कौशल्याने भल्या भल्या पैलवानांना मात देत अखेर किताबासाठी समोरासमोर उभे ठाकलेले विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील आता अंतिम किताबी लढतीत कसे झुंज देणार आणि कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
पावसाचा व्यत्यय आणि शुक्रवारचा संपूर्ण दिवस वाया….
मागील चार दिवसांपासून सातारा परिसरात तापमानाचा पारा वाढत होता. त्यामुळे परिणानस्वरुप शुक्रवारी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तात्पुरती स्थगित कराली लागली होती. अचानक आलेल्या पावसामुळे स्पर्धेचा लाईटचा मंडप कोसळला तसेच आखाड्यातील माती वाहून गेली.
( Maharashtra Kesari 2022 Vishal Bunkar And Prithviraj Patil Will fight for Title )
अधिक वाचा
Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीचा प्रमुख दावेदार सिकंदर शेखचा धक्कादाक पराभव, विशाल बनकर विजयी
Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील आतापर्यंतचे ९ धक्कादायक निकाल, वाचा एका क्लिकवर