---Advertisement---

विराटच्या राजीनाम्यानंतर तापले राजकारण! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जय शहांना टोला

On: सोमवार, जानेवारी 17, 2022 7:30 AM
---Advertisement---

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी (१५ जानेवारी) तडकाफडकी आपल्या नेतृत्वाचा राजीनामा (Virat Kohli Resign As Test Captain) दिला. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून शनिवारी कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला. त्या घटनेस २४ तास होण्याच्या आधीच विराटने हा निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच वेळी आता या निर्णयामुळे राजकारण देखील तापू लागल्याचे दिसून येतेय. महाराष्ट्र सरकारचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Maharashtra Minister Nitin Raut Slams Jay Shah) यांनी या घटनेनंतर एक ट्विट करत बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत.

काय म्हणाले राऊत?
महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट ऊर्जामंत्री असलेले नितीन राऊत हे आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखले जातात. विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनीदेखील एक ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले,
‘भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कप्तान विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील “शाहजाद्यांचं” राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय.
महंमद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता.’

राऊत यांचा हा रोख बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे होता. जय शहा हे भाजप नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत.

काय आहे राऊत यांच्या ट्विटचा संदर्भ
राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये विराट कोहली व भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांचा उल्लेख केला आहे. मागील वर्षी युएई येथे झालेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा पाकिस्तान संघाने पराभव केला होता. त्या सामन्यात मोहम्मद शमी याची गोलंदाजी समाधानकारक नव्हती. त्यानंतर अनेकांनी शमीवर धार्मिक टीका (People Troll Shami On Religion) केली होती. त्यावेळी विराट कोहली याने समोर येत शमीची पाठराखण करत त्याचे कौतुक केलेले. (Virat Kohli Backs Shami)

महत्त्वाच्या बातम्या-

दणदणीत विजयानंतरही अचानक थांबवला गेला ऑस्ट्रेलियन संघाचा जल्लोष; कारण होते आदर वाढवणारे (mahasports.in)

फक्त कर्णधार विराटच्या हट्टामुळे भारतीय संघाचे ‘स्वप्न ते स्वप्नच’ राहिले, माजी क्रिकेटरने साधला निशाणा (mahasports.in)

गावसकरांना रोहित नव्हे तर ‘या’ शिलेदारात दिसतोय भावी कसोटी कर्णधार, कारणासहित सांगितले नाव (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---