पुणे | टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या साकेत मायनेनी याने तैपेईच्या जेसन जूंगचा 6-1, 5-7, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनी याने तैपेईच्या जेसन जूंगचा 6-1, 5-7, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. ऑस्ट्रियाच्या सेबस्तियन ऑफनर याने दुसऱ्या मानांकित बेल्जीयमच्या रूबेन बेमेलमन्सचा 5-7, 6-3, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. इटलीच्या सातव्या मानांकित जियालूइजी क्वेनजी याने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या शशी कुमार मुकुंदचा 6-1, 6-1असा एकतर्फी पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. ब्राझीलच्या तिसऱ्या मानांकित थायगो मॉंटेरोने जर्मनीच्या डॅनियल ब्रॅंड्सचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 7-5असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
साकेत मायनेनी(भारत)वि.वि.जेसन जूंग(तैपेई) 6-1, 5-7, 6-2;
सेबस्तियन ऑफनर(ऑस्ट्रिया)वि.वि.रूबेन बेमेलमन्स(बेल्जीयम)(2)5-7, 6-3, 6-1;
जियालूइजी क्वेनजी(इटली)(7)वि.वि.शशी कुमार मुकुंद(भारत)6-1, 6-1;
थायगो मॉंटेरो(ब्राझील)(3)वि.वि.डॅनि
सिमॉन बोलेली(इटली)(5)वि.वि. ब्रेडन चेन्यूर(कॅनडा)6-3, 7-6(5);
अँटोनी हाँग(फ्रांस)(6)वि.वि.आंद्रेज मार्टिन(स्लोव्हाकिया) 6-1, 6-2;